२५ टक्के सफाई कामगार गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:07 AM2018-11-14T01:07:46+5:302018-11-14T01:09:10+5:30

१५५० सफाई कामगारांपैकी ३६७ गैरहजर त्यातील १६० जणांची विनापरवानाच दांडी, एका कामगाराच्या ऐवजी भलताच कामावर असे अनेक धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.१३) महापालिका प्रशासनाच्या आॅपरेशन क्लीनअपमध्ये आढळले.

25 percent of the cleaners are absent | २५ टक्के सफाई कामगार गैरहजर

२५ टक्के सफाई कामगार गैरहजर

Next
ठळक मुद्देआॅपरेशन क्लीनअप : विभागीय अधिकारी, निरीक्षकांना नोटिसासतत गैरहजर राहणारे होणार निलंबित

नाशिक : १५५० सफाई कामगारांपैकी ३६७ गैरहजर त्यातील १६० जणांची विनापरवानाच दांडी, एका कामगाराच्या ऐवजी भलताच कामावर असे अनेक धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.१३) महापालिका प्रशासनाच्या आॅपरेशन क्लीनअपमध्ये आढळले. आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे आढळले आहे. त्यामुळे सतत गैरहजर राहणाऱ्या कामगारांचे थेट निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहे तर एकूणच अव्यवस्थेविषयी विभागीय अधिकारी, विभागीय स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
शहराच्या विविध भागात अस्वच्छता त्या अनुषंगाने गेलेल्या महिन्याच्या अखेरीपर्यंत असलेली रोगराई या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी महासभेत प्रशासनाची घेतलेली झाडाझडती यामुळे प्रशासनाने मंगळवारी (दि.१३) भल्या सकाळी म्हणजे सहा ते सात वाजेच्या दरम्यान प्रत्येक प्रभागात (वॉर्डात) खाते प्रमुखांनी अचानक भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. खास गोपनीय बाब म्हणून सोमवारी (दि.११) रात्री उशिरा नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व खाते प्रमुख भल्या सकाळीच सर्व विभागात पोहोचले तसेच सफाई कामगारांच्या हजेरी शेडला भेटी दिल्या. त्यावेळी अनेक चमत्कारीक प्रकार आढळले.
बहुतांशी ठिकाणी वेळेवर कामगारांची हजेरी नव्हती. तसेच अनेक ठिकाणी कामगार गैरहजर असल्याचे हजेरी मस्टरवर नोंदविले होते मात्र अनेक ठिकाणी वेळ उलटून गेल्यानंतरही पूर्वसूचना न देताच कामगार गैरहजर असल्याचे आढळले. महापालिकेकडे एकूण १५५० सफाई कामगार आहेत. त्यापैकी १६० कामगार गैरहजर होते. तर २०७ कामगार हे पूर्वसूचनेवरून गैरहजर होते, परंतु दीड हजारपैकी तीनशे कामगार एकाच दिवशी गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.




इतक्या कमी कर्मचाºयांमध्ये सफाईचे काम कसे शक्य होतील असाही प्रश्न निर्माण झाला. मिळालेली माहिती संकलित करून सर्व माहिती प्रशासनाला सादर करण्यात आली. त्यानंतर दुपारी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झाडाझडती घेतली. यावेळी हजेरी शेडला भेट देणे हे विभागीय अधिकाºयांचे नियमित काम असताना अनेक दिवसांत किंवा महिन्यात अधिकाºयांनी भेटी दिल्या नसल्याचे आढळले. तसेच बोगस कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षकांचे दुर्लक्ष या सर्व पार्श्वभूमीवर संबंधिताना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जे कामगार वारंवार गैरहजर राहात आहेत आणि महापालिकेला प्रतिसादही देत नाही अशा सर्वांनाच निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
घंटागाड्या वाचल्या
महापालिकेच्या या मोहिमेत घंटागाड्यांची पोलखोल करण्याचेदेखील नियोजन होते. मात्र, आॅपरेशन क्लीनअप अवघ्या तासाभरासाठी होते तोपर्यंत अनेक प्रभागात घंटागाड्या सुरूदेखील झाल्या नव्हत्या. त्यामुळे लवकरच आॅपरेशन घंटागाडीदेखील करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
एकाच्या नावावर दुसराच करतो काम
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ मध्ये एका सफाई कामगाराच्या जागी कंत्राटी कर्मचारी काम करीत असल्याचे एका खाते प्रमुखाच्या पाहणीत आढळले. त्यावरदेखील कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेत कायम कर्मचाºयांकडून परस्पर खासगी व्यक्ती नेमून काम करण्याचे प्रकार यापूर्वीही चर्चेत होते.

Web Title: 25 percent of the cleaners are absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.