शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

अडीच एकरमध्ये घेतले २५ लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: September 8, 2016 00:44 IST

प्रगतिशील : गारपीट, दुष्काळावर मात करत तंत्रज्ञानाने साधला समतोल

खामखेडा : येथील शेतकऱ्याने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळातही आर्थिक समतोल साधत तीन वर्षांपासूनचे दुष्काळाचे चटके सोसत, अल्पपाण्यावर अडीच एकर शेतीमध्ये हिरव्या मिरचीचं भरघोस उत्पन्न घेत तब्बल पंचवीस लाखांचं उत्पन्न घेत आदर्श निर्माण केला आहे.गारपीट, अवकाळी पाऊस व तीव्र दुष्काळ अशा दुष्टचक्रात पारंपरिक शेतीमधील उत्पादनात घट होत भांडवल निघत नसताना, मोकळ्या शेतात मल्चिंग पेपरचा वापर न करता येथील अशोक अहिरे यांनी आपल्या अडीच एकर शेतीमध्ये पंचवीस लाख रुपयांचे हिरव्या मिरचीचं उत्पादन घेतलंय. कमी पाण्यात इनलाइन सिंचन पद्धतीवर येणारं पीक म्हणून अहिरे यांनी हिरव्या मिरचीचा निवडलेला पर्याय, कमी कालावधीत मिळवलेले उत्पादन जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.कसमादे परिसरातील देवळा भागात मागील तीन वर्षात गारपीट, अवकाळी पाऊस व नंतर तीव्र दुष्काळ अशी नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांची कसोटी पाहिली. या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील भांडवलही सुटले नाही. अशा काळात अहिरे यांनी या वर्षी बाजारभावाचा अभ्यास करून हिरव्या मिरचीच्या पिकाची निवड केली.नाशिक येथील एका नर्सरीतून पंचवीस हजार रोपं आणली. ड्रिपच्या जोडणीवर मिल्चिंगचा वापर न करता मिरचीची लागवड केली. रोपं, खते, मजुरी असा सर्व एकत्रित पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत हा खर्च आल्याचं सांगितले. आतापर्यंत त्यांनी तब्बल पन्नास टन मिरचीची विक्री स्थानिक बाजारात तसेच धुळे, जळगाव, नवापूर, मुंबई अशा बाजारात केली. त्यांच्या मिरचीला सरासरी रुपये ६० ते ६५ रुपये भाव मिळाला. सर्वाधिक ८० रुपये किलोने त्यांनी मिरची विकली. या मिरचीतून पन्नास टनाचे त्यांना जवळपास पंचवीस लाखाहून अधिक पैसे मिळालेत. आणखी पाच सहा टन उत्पादन निघेल, अशी आशा आहे. बाजारभाव पडले नाहीत तर अजूनही उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी तीव्र दुष्काळामुळे मिरचीच्या घेतलेल्या उत्पादनामुळे हंगामभर मिरची तेजीत असल्याने अहेर यांना हिरव्या मिरचीने मालामाल केले. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळातही आर्थिक समतोल कसा टिकून राहतो याचं उदाहरण अशोक अहिरे यांनी घालून दिलंय. (वार्ताहर)