शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

२४० कोटींची देयके सादर

By admin | Updated: April 2, 2017 01:11 IST

नाशिक : जिल्हा परिषदेची सर्व विभागांची मिळून २३९ कोटी ९९ लाखांची देयके ३१ मार्चअखेर जिल्हा कोषागार कार्यालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त विभागामार्फत जिल्हा परिषदेची सर्व विभागांची एकत्रितमिळून २३९ कोटी ९९ लाखांची देयके ३१ मार्चअखेर जिल्हा कोषागार कार्यालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा परिषदेने शनिवारपर्यंत १६९ देयके जिल्हा कोषागार कार्यालयात सादर केल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची मार्च एण्डची घाई सुरू होती. जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाला मार्च एण्डच्या लगीनगाईत शुक्रवारी (दि.३१) ३५ कोटींचा निधी सायंकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर शुक्रवारी दिवसभरात ७२ कोटी ५८ लाखांची सुमारे १२५ देयके जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाला रस्ते व पुलांच्या कामांसाठी २० कोटी, तर लघुपाटबंधारे विभागाला बंधाऱ्यांच्या कामासाठी १५ कोटींचा निधीही अखेरच्या दिवशी प्राप्त झाल्याचे कळते. २९ व ३० मार्च या दोन दिवसांत सुमारे १६ कोटींची २२० देयके जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात आल्याचेही सूत्रांचे म्हणणे होते. २९ मार्च रोजी जिल्हा परिषदेला १८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. गुरुवारी (दि.३०) जिल्हा परिषदेला शासनाकडून ४१ कोटींचा निधी उपलब्ध झाला. त्यात ग्रामपंचायत विभागाला २० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. पहिल्या दिवशी सुमारे १२ कोटींची १५० देयके जिल्हा कोषागार कार्यालयास सादर करण्यात आली होती. गुरुवारी सुमारे ४ कोटींची ७० देयके जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता ३१ मार्च उलटल्यानंतर २३९ कोटी ९९ लाखांची देयके जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)