शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

२० तोळे दागिन्यांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 23:52 IST

फेब्रुवारीत चेनस्नॅचिंगच्या आठ घटना : सातपूर, गंगापूर, इंदिरानगर लक्ष्य

नाशिक : पायी जाणाऱ्या, दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांना लक्ष्य बनवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची पोत खेचून नेल्याच्या घटना रोखण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचे चित्र असून, फेब्रुवारीमध्ये चेनस्नॅचिंगच्या आठ, तर तोतया पोलिसांनी लूट केल्याची एक घटना घडली आहे़ चेनस्नॅचिंगच्या या घटना प्रामुख्याने गंगापूर, सातपूर व इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडल्या असून, या हद्दीतील पोलीस पेट्रोलिंग, गुन्हे शोध पथक यांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जाते आहे़ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेणाऱ्या संशयितांनी काळ्या रंगाचा दुचाकीचा वापर केल्याचे तसेच पायी व दुचाकीवर जाणाऱ्या महिलांना लक्ष्य केल्याचे दिसून येते़ दुचाकीवरील दोघांपैकी एक जण पत्ता विचारण्याचा बहाणा करतो, तर दुसरा महिलेचे लक्ष नसल्याचे बघून गळ्यातील मंगळसूत्र वा साखळी खेचतो़ फेब्रुवारीतील चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये गंगापूर, सातपूर व इंदिरानगरमध्ये प्रत्येकी दोन घटना घडल्या असून, सरकारवाडा व मुंबई नाका परिसरात एक घटना घडली आहे़ फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात तीन व दुसऱ्या पंधरवाड्यात पाच चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या़ २७ ते २९ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत चार घटना घडल्या असून, यामध्ये गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत सलग दोन दिवस चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत़ पोलीस आयुक्तालयातर्फे २८ तारखेला अर्धमॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते़ या मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांची गोल्फ क्लब मैदानावर तैनात करण्यात आले होते़, तर दुसऱ्या दिवशी हे सर्व श्रमपरिहारासाठी गेल्याने या चोरट्यांनी संधीचा फायदा घेतल्याचे दिसून येते़ (प्रतिनिधी)