शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

२० टक्के गृहिणींनी दिला मोलकरणींना नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:17 IST

नाशिक :  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात साऱ्यांचीच ससेहोलपट झाली. अनेकांनी नोकºया गमावल्या. लाखो मजुरांनी स्थलांतर केले. व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात झाली. ‘लोकमत’ने याच गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सर्वेक्षणातून केला.

धनंजय वाखारे / नाशिक :  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात साऱ्यांचीच ससेहोलपट झाली. अनेकांनी नोकºया गमावल्या. लाखो मजुरांनी स्थलांतर केले. व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात झाली. विद्यार्थीवर्गाचे शैक्षणिक वर्ष अडचणीत आले. एवढे सारे अनर्थ एका कोरोना विषाणूने केले. त्यात सर्वांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आल्याने अर्थातच घरसंसाराचा गाडा हाकणाºया गृहिणींची सर्वाधिक कसरत बघायला मिळाली.गृहिणींनी हा लॉकडाऊनचा काळ कसा सोसला, भोगला आणि अनुभवला याबाबतचे सर्वेक्षण ‘लोकमत’ने केले आणि अनेक धक्कादायक बाबी नोंदविल्या गेल्या. प्रामुख्याने, लॉकडाऊन काळात गृहिणींनी आपल्या मासिक बजेटमध्ये सुमारे ५० टक्के कपात केल्याचे, तर २० टक्के गृहिणींनी घरकामासाठी लावलेल्या मोलकरणींना सुट्टी दिल्याचे समोर आले. लॉकडाऊनमुळे व्यापार-उद्योग बंद असल्याने व्यावसायिक घरातच बंदिस्त झालेले, शासकीय-निमशासकीय कार्यालयात केवळ ५ ते २० टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे अनेकांचे ‘वर्क आॅफ होम’, शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या दिल्याने मुलेही घरीच. सारे घर माणसांनी भरलेले. त्यामुळे अर्थातच चोवीस तास घरकामात राहणाºया गृहिणींचा वर्कलोड वाढला. लॉकडाऊन काळात घराची दैनंदिनी सांभाळताना गृहिणींना प्रचंड कसरत तर करावी लागली. अनेकांनी अनावश्यक खर्चाला कात्री लावली तर चैनीच्या गोष्टींना मुरड घातली. हॉटेल्स, पार्लर्स बंद असल्याने खर्चात बचत झाली असली तरी, सतत आॅनलाइनमुळे मोबाइल बिलातही अवाजवी वाढ झाल्याचा धक्काही बसला. ‘लोकमत’ने याच गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सर्वेक्षणातून केला.-------------------...जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गृहिणींना असे विचारले प्रश्न ?तुम्ही घरात मासिक बजेटमध्ये किती आणि कशात कपात केली आहे?गेल्या तीन महिन्यांत तुम्ही कशाला प्राधान्य दिले?पैशांची आवक कमी झाल्याने घरात वाद-भांडणे, चीडचीड होते आहे का?पती, मुले यांच्या वर्क फ्रॉम होममुळे कामाचे स्वरूप बदलले आहे का?गेल्या तीन महिन्यांतील स्थितीमुळे तुमच्या मानसिक तणावात भर पडली अथवा तुम्ही आजारी पडलात का?गेल्या तीन महिन्यांत पैशांची आवक कमी झाल्याने घरातील धुणी-भांडी काम करणारी मोलकरीण कामावरून काढून टाकली आहे का?पाच टक्के गृहिणींचीबजेटमध्ये ७५ टक्के कपातलॉकडाऊन काळात गृहिणींनी आपल्या घरखर्चात निम्म्याहून अधिक कपात केल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. त्यात ५० टक्के गृहिणींनी बजेटमध्ये ५० टक्के कपात केली, तर ३० टक्के महिलांनी २५ टक्के कपात केल्याचे समोर आले. ५ टक्के महिलांनी ७५ टक्के कपात केली. त्यात बºयाच घरांमध्ये कर्त्या माणसांचा रोजगार-नोकरी गेल्याचे सांगण्यात आले. १५ टक्के महिलांनी मात्र बजेटमध्ये काहीही फरक पडला नसल्याचे सांगत लॉकडाऊन पूर्वीप्रमाणेच स्थिती ‘जैसे थे’ होती, असे स्पष्ट केले.७१ % महिलांनीस्वत:च केले घरकामलॉकडाऊन काळात अनेकांनी आपल्या दैनंदिन खर्चात कपात केली. बजेट निम्म्यावर आणले. अनावश्यक खर्चाला कात्री लावली. घरकामासाठी लावलेल्या मोलकरणींनाही सुट्टी दिली गेली. त्यात २० टक्के गृहिणींनी मोलकरणींचा खर्च परवडत नाही म्हणून त्यांना कामावरून काढून टाकल्याचे म्हटले आहे, तर ९ टक्के गृहिणींनी मोलकरणीस कामावर कायम ठेवल्याचे सांगितले. शिवाय, सध्या तरी त्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. ७१ टक्के गृहिणींनी मात्र घरातील काम आपण स्वत:च करत असल्याचे सांगितले. त्यामुळे मोलकरणींना कामावरून काढून टाकण्याचे प्रमाण खूप मोठे नसल्याचे समोर आले.गृहिणींनी किराणा सामाना पाठोपाठ भाजीपाल्याला पसंती दिली. लॉकडाऊन काळात पार्लर्स, कॉस्मेटिक्स-सौंदर्यप्रसाधनांची दुकाने बंदच असल्याने त्यावरचा खर्च कमी झाल्याचे अनेक महिलांनी सांगितले. कापड विक्री आणि मॉल्सही बंद असल्याने साड्या-ड्रेस खरेदीलाही लगाम बसला. आॅनलाइन खरेदीला ब्रेक बसला.किराणा सामानालासर्वाधिक प्राधान्यलॉकडाऊन काळात सारे घर माणसांनी भरल्याने दिवसभरात खाणाºयांची तोंडे वाढली. त्यातच लॉकडाऊनमुळे किराणा दुकानेही बंद होण्याच्या भीतीपोटी अनेकांनी किराणा सामानाचा साठा करून ठेवण्यावर भर दिला. लॉकडाऊन काळात ९१ टक्के महिलांनी जीवनावश्यक असणाºया किराणा सामान खरेदीलाच सर्वाधिक पसंती दिल्याचे समोर आले.२० टक्के गृहिणींचेबदलले कामाचे स्वरूपकोरोनाचा संसर्ग होऊ नये अनेकांनी वर्क फ्रॉम होम केले. त्यातच शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याने मुले घरीच थांबली. अशावेळी गृहिणींच्या दैनंदिन कामात काही फरक पडला काय, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यात २० टक्के गृहिणींनी दैनंदिन कामाचे स्वरूप बदलल्याचे सांगितले, तर ३३ टक्के गृहिणींनी काहीही फरक पडला नसल्याचे स्पष्ट केले. ४० टक्के महिलांनी थोडाफार फरक पडल्याचे सांगितले. ७ टक्के महिलांनी त्यामुळे काहीच फरक पडला नसल्याचे स्पष्ट केले. पतीसह मुले घरी असल्यामुळे घरात सुरक्षितता आणखी वाढलीच, शिवाय त्यांच्या आनंदात सहभागी होता आल्याचेही अनुभव अनेक गृहिणींनी शेअर केले.

तणावाबाबत २ टक्के गृहिणींचे मौनलॉकडाऊनच्या कठीण काळात अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांना आपल्या नोकºया गमवाव्या लागतानाच बºयाच जणांच्या वेतनात ५० टक्क्यांहून अधिक कपात झाली. व्यापार-उदीम ठप्प झाल्याने मानसिक तणावात भर पडत गेली. त्यामुळे अनेकांना आजारही जडल्याचे सांगण्यात आले. त्यात ४ टक्के गृहिणींनी मानसिक ताण-तणाव वाढल्याची कबुली दिली, तर ६४ टक्के महिलांनी मानसिक ताण-तणावाचा स्पर्शही झाला नसल्याचे स्पष्ट केले. ३० टक्के महिलांनी कधी-कधी मानसिक ताण वाढल्याचे सांगितले. २ टक्के गृहिणींनी मात्र असाताण वाढत असला तरी आपण अन्य कुणाशी त्याबाबत काही शेअर केले नसल्याचे म्हटले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक