शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

दारू पिण्यासाठी ५७ वर्षाच्या मुलाने ८२वर्षीय आईचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 6:16 PM

नशेची हौस भागविण्यासाठी आपल्या वृध्द आईकडे पैसे मागितले, आईने पैसे दिले नाही, म्हणून घराच्याच भींतीवर जन्मदात्रीचे डोके आपटले. त्यात ८२ वर्षीय कांताबाई शिवलाल काळे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातपूर भागात

ठळक मुद्देकांताबाई शिवलाल काळे यांचा मृत्यू दारूने जीवनाची केली वाताहतआईचे डोके धरून भींतीवर आपटले.

नाशिक : ज्या स्त्रीला मातृत्व लाभते ती आई बनते आणि जगातील सर्वश्रेष्ठ असे नाते त्या स्त्रीला मिळते. नऊ महिने पोटात वाढवून जन्माला घातलेल्या बाळाला लहानाचे मोठे करताना आई त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. त्यासाठी तिने उपसलेले कष्ट हे तिलाच ठाऊक असते म्हणून कवी यशवंत यांनी आईची महती सांगताना ‘स्वामी तीन्ही जगाचा आई विना भिकारी...’ असे म्हटले आहे. मातृत्वाच्या नात्याचा विसर उतारवयाकडे असलेल्या नशेबाज मुलाला पडला अन् त्याने नशेची हौस भागविण्यासाठी आपल्या वृध्द आईकडे पैसे मागितले, आईने पैसे दिले नाही, म्हणून घराच्याच भींतीवर जन्मदात्रीचे डोके आपटले. त्यात ८२ वर्षीय कांताबाई शिवलाल काळे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातपूर भागात घडल्याचे उघडकीस आले आहे.सातपूर भागात कांताबाई काळे हे त्यांच्या दादासाहेब गायकवाड सोसायटीत राहत होत्या. यावेळी त्यांचा मुलगा संशयित कमलाकर शिवलाल काळे (५७,रा मोरे मळा, नाशिकरोड), याने कांताबाई यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांचा तगादा लावला. आईने नकार दिला असता या क्रूरकर्म्या मुलाने वृध्द आईला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी संशयित कमलाकर याने आईचे डोके धरून भींतीवर आपटले. त्यामुळे डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्या बेशुध्द पडल्या. त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२३) त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित कमलाकर यास दुपारी अटक केली असून प्राणघातक हल्ल्याची नोंद आता खूनात रूपांतरीत झाली. पोलिसांनी त्याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यास बुधवारी (दि.२३) न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक एस.डी.चव्हाण करीत आहेत.---दारूने जीवनाची केली वाताहतकमलाकर हा काही वर्षांपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात चालक होता. व्यसनामुळे त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली आणि त्याच्या कुटुंबाची वाताहत झाली. कमलाकर याने दारूपायी आपल्या वृध्द आईवरदेखील हल्ला चढवून ठार मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीMurderखूनArrestअटक