शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

वीस दिवसांत ३०८८ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:49 AM

सकाळच्या सुमारास उन्हासह जाणवणारा उकाडा आणि सायंकाळी बरसणाऱ्या रिमझिम सरींच्या वर्षावाचा सध्या नाशिककर अनुभव घेत आहेत. गेल्या वीस दिवसांत जिल्ह्णात ३०८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये झाला आहे.

ठळक मुद्देपावसाच्या सरी : सायंकाळनंतर सर्वाधिक पाऊस

नाशिक : सकाळच्या सुमारास उन्हासह जाणवणारा उकाडा आणि सायंकाळी बरसणाऱ्या रिमझिम सरींच्या वर्षावाचा सध्या नाशिककर अनुभव घेत आहेत. गेल्या वीस दिवसांत जिल्ह्णात ३०८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये झाला आहे.आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने जिल्ह्णात महापूर आला होता. त्यामुळे जिल्ह्णातील धरणांनी शंभरी गाठली असून, प्रशासन तसेच शेतकरीदेखील समाधानी झाला आहे. या महिन्यात सातत्याने कधी पाऊस तर कधी हुलकावणी असा पावसाचा खेळ सुरूच राहिला. विशेषत: या महिन्यातील पंधरवड्यात सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने नाशिकरांची धांदल उडत आहे. गेल्या आठ दिवसांपासून आकाशात ऊन पावसाच्या पाठशिवणीचा खेळ सुरू असून, अनिश्चित पावसामुळे नाशिककरांच्या दैनंदिन व्यवहारावरदेखील परिणाम झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात ३०८८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर गुरुवारी ३२९ मि.मी. इतका पाऊस नोंदविण्यात आला. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस हा इगतपुरी तालुक्यात नोंदविण्यात आला असून, ६२९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. पेठ तालुक्यात ४७४, तर सुरगाणा तालुक्यात ३९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. येवल्यातही १३० पावसाची नोंद झाली. नाशिकमध्ये ९७.१, त्र्यंबकेश्वरला २५७ मि.मी., मालेगाव १३३, नांदगाव १९०, चांदवड १६२, कळवण ८४,बागलाण ९८, देवळा १०१, निफाड ७९,निफाड ७९, सिन्नर ७४ मि.मी. याप्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे.हवामान खात्याला हुलकावणीबुधवार आणि गुरुवारी जिल्ह्यातील डोंगरीभागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती; मात्र हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरवित पावसाने डोंगरीभाग वगळता शहरातील भागातच हजेरी लावली. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथे अनुक्रमे ९ आणि १० मि.मी. इतकाच पाऊस झाला. जिल्ह्यातील अन्य भागांत मात्र २० ते ५० मि.मी.पर्यंत पावसाची मजल गेली. विशेष म्हणजे पावसाची कमतरता जाणवणाºया सिन्नर तालुक्यात एका दिवसात ५१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर निफाडसारख्या तालुक्यातदेखील २३ मि.मी. पावसा नोंदविण्यात आला. चांदवडमध्येदेखील ४१ मि.मी. पाऊस झाला. विशेष म्हणजे या तीनही ठिकाणी हंगामात कमी पाऊस झालेला असताना परतीला मात्र पावसाच्या सरी होताना दिसत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस