जिल्ह्यात १५३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 02:00 IST2021-07-30T01:59:50+5:302021-07-30T02:00:49+5:30
जिल्ह्यात गुरुवारी (दि. २९) एकूण १५३ नागरिक कोरोनामुक्त झाले असून ११९ नवीन बाधित आढळून आले आहेत. दरम्यान नाशिक ग्रामीणला दोन जणांचा मृत्यु झाला असून सलग दुसऱ्या दिवशी मनपा क्षेत्रात एकाही मृत्युची नोंद नाही.

जिल्ह्यात १५३ कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. २९) एकूण १५३ नागरिक कोरोनामुक्त झाले असून ११९ नवीन बाधित आढळून आले आहेत. दरम्यान नाशिक ग्रामीणला दोन जणांचा मृत्यु झाला असून सलग दुसऱ्या दिवशी मनपा क्षेत्रात एकाही मृत्युची नोंद नाही.
गुरुवारी ग्रामीणला गेलेल्या दोन बळींमुळे आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ८५०६ वर पोहोचली आहे. तर बाधित आढळून आलेल्या ११९ रुग्णांमध्ये ३९ नाशिक मनपा क्षेत्रातील तर ७४ नाशिक ग्रामीणचे आणि ६ जिल्हाबाह्य रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या दीड हजाराच्या खाली आली असून ती १४७३ पर्यंत पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील कोरोना मुक्ततेच्या प्रमाणात अल्पशी वाढ होऊन ते सरासरी ९७.६३ वर पोहोचले आहे.