शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामांना १५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:42 IST

येवला : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज असल्याने या भागात २० नव्या बंधाऱ्यांना मान्यता देताना नऊ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला राज्य शासनाने परवानगी दिली असून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देयेवला तालुका : २० नव्या बंधाऱ्यांना मान्यता

येवला : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज असल्याने या भागात २० नव्या बंधाऱ्यांना मान्यता देताना नऊ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला राज्य शासनाने परवानगी दिली असून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.सदर भाग पूर्णतः अवर्षणप्रवण असून या भागात पडलेले पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. परिणामी, डिसेंबरनंतर येथे टंचाई जाणवते. त्यामुळे छोटे-मोठे पाझर तलाव, बंधारे, सिमेंट बांध होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. त्यानुसार, राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी राजापूर येथे ८ सिमेंट काँक्रिट बंधाऱ्याच्या कामांना मंजुरी दिली आहे.याशिवाय ममदापूर येथे पाच, रहाडी येथे २, खरवडी येथे २ व सोमठाणजोश येथे ३ अशा एकूण २० सिमेंट काँक्रिटीकरण बंधाऱ्याच्या कामांना सुमारे १२ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे.याशिवाय भारम येथे सिमेंट काँक्रिटचा बांध व साठवण तलाव, रहाडी येथे दोन गावतळे, नगरसुल येथे साठवण बांध व गावतळे, डोंगरगाव येथे साठवण तलाव तर ममदापूर व पाटोदा येथे साठवण तलावाच्या दुरुस्तीला सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या कामांना लवकरच तांत्रिक मान्यता मिळून प्रारंभ केला जाणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRural Developmentग्रामीण विकास