शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

११५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी

By admin | Updated: March 2, 2017 01:00 IST

सिन्नर : सन २०१७-१८ च्या ११५ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मंगळवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

सिन्नर : सन २०१७-१८ च्या ११५ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मंगळवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कोणतीही करवाढ नसलेला तसेच शहरातील रस्ते आणि बंदिस्त गटारींची कामे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आदि मूलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. करवाढ नसल्याने सिन्नरकरांना दिलासा देणारा अर्थसंकल्प ठरला. नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी अंदाजपत्रकाच्या जमा-खर्चाची मांडणी सादर केली. शासनाकडून आलेल्या विविध अनुदानांतील ३१ कोटी ३१ लाख रुपये नगरपालिकेच्या तिजोरीत शिल्लक असून, मालमत्ता करांसह विविध करांच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत ९ कोटी ६२ लाख ३० हजार रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. बांधकाम विकास शुल्क, जागाभाडे, आठवडे बाजार फीसह विविध फींच्या माध्यमातून तीन कोटी ३० लाख ६० हजार उत्पन्न पालिकेला मिळणार आहे. मुद्रांक शुल्कासह शासनाकडून विविध करांच्या अनुदानातून पाच कोटी ८४ लाख ३२ हजार नगरपालिकेच्या तिजोरीत येतील असा अंदाज धरण्यात आला आहे. विविध बॅँकातील ठेवींवरील व्याजासह विविध शासकीय करांतील सुटीपोटी एक कोटी ३८ लाख १० हजार रुपये अपेक्षित आहेत. नगरपालिकेचे महसुली उत्पादन ५२ कोटी ४६ लाख ३५ हजार १९५ गृहीत धरण्यात आले आहे. पाणीपट्टी, घरपट्टी व अन्य करात कुठलीही वाढ न करता रस्ते आणि बंदिस्त गटारींच्या कामांना या अर्थसंकल्पात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. रस्ते बांधकामासाठी दोन कोटी, बंदिस्त गटारीच्या बांधकामासाठी ५० लाख, शौचालय बांधकामासाठी ५० लाख, नायगाव रस्त्यावरील व्यापारी गाळ्यांसाठी तीन कोटी, घनकचरा प्रकल्प व्यवस्थापनासाठी तनी कोटी, पुतळे उभारणी व हुतात्मा स्मारकासाठी २५ लाख, कडवा पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी दहा कोटी, दलितवस्ती सुधारणा कामांसाठी सहा कोटी, वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी दोन कोटी आणि वाढीव हद्दीच्या विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. बैठकीस उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, गटनेते हेमंत वाजे, सोमनाथ पावसे, गोविंद लोखंडे, शैलेश नाईक, विजय जाधव, पंकज मोरे, बाळू उगले, शीतल कानडी, संतोष शिंदे, नलिनी गाडे, श्रीकांत जाधव, मल्लू पाबळे, प्रतिभा नरोटे, नामदेव लोंढे, अलका बोडके, विजया बर्डे, सुहास गोजरे, सुजाता तेलंग, प्रणाली भाटजिरे, मंगला शिंदे, मालती भोळे, प्रिती वायचळे, रुपेश मुठे, गीता वरंदळ, ज्योती वामने, निरुपमा शिंदे, वासंती देशमुख, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, जनसंपर्क अधिकारी नितीन परदेशी, लेखापाल प्रियंका गांगुर्डे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)