शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

1,12,536 नवमतदारांची नोंदणी

By admin | Updated: October 28, 2016 00:47 IST

मनपा निवडणूक : अभियानाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्तपणे राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत तब्बल एक लाख १२ हजार ५३६ नवमतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मतदार संख्येत सुमारे ८ ते १० टक्क्यांनी भर पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका निवडणुकीसाठी शहरात महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी अभियान दि. १५ सप्टेंबर ते २१ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात आले. महापालिकेने सर्व ६१ प्रभागांसह सहाही विभागीय कार्यालयात मतदार नोंदणी कक्ष स्थापन केला होता शिवाय शहरातील २३ महाविद्यालयांमध्येही नोंदणी कक्षाची उभारणी करण्यात आली होती. जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने समोर ठेवले होते. त्यासाठी स्वत: आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यासह संदेशदूत नेमलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुणाईला आवाहन केले होते. याशिवाय, महापालिकेने चौकाचौकात मतदारांना आवाहन करणारे फलक उभारले होते तसेच सोशल मीडियाचाही आधार घेण्यात आला होता. सहाही विभागांत प्रचाररथ तयार करण्यात येऊन ध्वनीक्षेपकाद्वारे मतदारांना आवाहन केले जात होते. त्याची फलश्रुती म्हणून अभियानात तब्बल एक लाख १२ हजार ५३६ नवमतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. त्यात ६६ हजार ६३५ पुरुष, तर ४५ हजार ९०१ महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच १४३७ मतदारांची नावे वगळण्यात आली असून, २२९३ मतदारांच्या नावात दुरुस्तीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत, तर २१३० मतदारांचे स्थलांतराचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वसाधारणपणे मतदार नोंदणी अभियानात सरासरी अडीच टक्के वाढ अपेक्षित धरली जाते. परंतु, महापालिका व जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे राबविलेल्या मोहिमेमुळे सुमारे ८ ते १० टक्क्यांनी मतदारांमध्ये वाढ झालेली आहे. (प्रतिनिधी)