शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. आरोग्य सभापतींकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे मालेगाव रिटर्न झालेले येथील पशुधन विकास अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे मालेगाव रिटर्न झालेले येथील पशुधन विकास अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने गावात उपाययोजना करण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती जयश्री पाटील यांनी येथील आरोग्य केंद्रात भेट देऊन ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.मालेगाव येथील रहिवासी व सारंगखेडा येथे पशुधन विकास अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. त्यामुळे गावात विविध उपाययोजना करण्यात आल्या. या अधिकाºयाच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती जयश्री दीपक पाटील यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रभारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन कामाचा आढावा घेतला.या आरोग्य केंद्रात अत्यावश्यक कर्मचाºयांची पदे तीन वर्षापासून रिक्त असून कायमस्वरूपी एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी नेमण्याची गरज आहे. केंद्राच्या इमारतीच्या छताला गळती लागत असल्याने पावसाळ्यापूर्वी त्याची दुरुस्ती करून देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रसूतिगृह, औषध भांडार, प्रयोगशाळा, वैज्ञानिक विभाग, बाह्यरुग्ण आदींचीही जयश्री पाटील यांनी पाहणी केली. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित नसल्याने त्यांच्यामुळे कर्मचाºयांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.या वेळी संजय मोरे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत चौधरी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, औषध निर्माण अधिकारी परदेशी, वरिष्ठ सहायक कावेरी सोनवणे, आरोग्य सेविका मनीषा रामोळे, ठाकरे, सांगळे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.