शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जि़.प. आणि पं.स निवडणूकीचा बिगुल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांवरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले असून जिल्हा प्रशासनाने जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांवरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले असून जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेचे ५६ गट आणि ११२ पंचायत समिती गण यांच्या निवडणूक कार्यक्रम सुरु झाल्याची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत केली़ मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली़सर्वोच्च न्यायालयात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर अधिसूचना लागू झाल्यावरही नंदुरबारसह राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका रद्द होण्याची शक्यता व्यक्त होत होती़ मंगळवारी न्यायालयाने या संदर्भात निकाल दिल्यानंतर निवडणूक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात आला आहे़ यानुसार नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समित्यांसाठी १८ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे़ यासाठी तालुकास्तरावर कक्षांची निर्मिती करण्यात आली असून आॅनलाईन अर्ज दाखल करणाºया सदस्यांनी अर्जाची पोहोच पावती कक्षांमध्ये दाखल करण्याची माहिती उपजिल्हाधिकारी धनंजय निकम व निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली़जिल्ह्यात पार पडणाºया या निवडणूक कार्यक्रमासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ अप्पर जिल्हाधिकारी डी़एम़ बोरुडे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे़४१८ डिसेंबर ते २३ डिसेंबर या काळात दाखल होणाºया नामनिर्देशन पत्रांची छाननी २४ डिसेंबर रोजी होणार आहे़ त्याच दिवशी वैध अर्जांची घोषणा करण्यात येणार असून यादी प्रसिद्ध होणार आहे़४याप्रक्रियेनंतर ३० डिसेंबर रोजी जेथे अपील नाही तेथे व १ जानेवारी २०२० रोजी जेथे अपील आहे तेथे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात येईल़४याप्रक्रियेनंतर केवळ पाच दिवस प्रचार करुन ७ जानेवारी रोजी जिल्ह्यातील १ हजार २२९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे़ यानंतर आठ जानेवारी रोजी सर्व सहा तालुकास्तरावर गण आणि गटनिहाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन निकालांची घोषणा करण्यात येईल़४अक्कलकुवा तालुक्यात १०, धडगाव ७, तळोदा ५, शहादा १४, नंदुरबार १० तर नवापुर तालुक्यातील १० अशा ५६ गटांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असून एकूण १० लाख ४ हजार ८७३ मतदार मतदान करणार आहेत़४जिल्ह्यात ७ जानेवारी २०२० रोजी होणाºया या मतदान प्रक्रियोसाठी ६ हजार ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून बुधवारपासून कर्मचारी नियुक्ती आणि संवेदनशील मतदान केंद्र कोणते याची माहिती गोळा करण्यात येणार आहे़४जिल्हा परिषद निवडणूक तसेच आरक्षण कार्यक्रमात कोणताही फेरबदल न करता प्रक्रिया पुढे ठेवण्यात येणार आहे़ अक्कलकुवा पंचायत समितीचे २०, धडगाव १४, तळोदा १०, शहादा २८ तर नंदुरबार आणि नवापुर पंचायत समितीच्या प्रत्येकी २० गणांसाठीचे आरक्षणही जैसे थे आहे़४निवडणूकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या निरीक्षणात निवडणूक आचारसंहिता कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे़ याठिकाणी आचारसंहिता उल्लंघन तसेच इतर तक्रारी करता येणार आहेत़४जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकीसाठी लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर व्हीव्हीपॅट मशीन वापरले जाण्याची शक्यता होती़ परंतू राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचात निवडणूकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम मशिन वापरण्याचे आदेश दिले असून दीड हजार ईव्हीएम दाखल होणार आहेत़