शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

अॅण्टी कोवीड फोर्ससाठी युवक, नोकरदार सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याची लोकसंख्या, वाढलेला विस्तार, दोन राज्यांची सिमा, दुर्गम भाग लक्षात घेता कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याची लोकसंख्या, वाढलेला विस्तार, दोन राज्यांची सिमा, दुर्गम भाग लक्षात घेता कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर पोलीस दलालाही मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात अॅण्टी कोवीड फोर्स हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी राबविला आहे. त्यासाठी कर्मचारी, युवक, माजी सैनिक यांना आवाहन करण्यात आले असून   त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सांभाळतांना कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन आणि संचारबंदी याचा ताण पोलीस दलावर आला आहे. याशिवाय राज्यात इतर ठिकाणी बंदोबस्तासाठी मागणीप्रमाणे पोलीस कर्मचारी पाठविणे आलेच. अशा वेळी सुमारे 18 ते 20 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात पोलिसांना मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेता गावागावात यापूर्वी ग्राम सुरक्षा दलाचा उपक्रम राबविण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता शहरी भागासह मोठय़ा गावांमध्ये अॅण्टी कोवीड फोर्स अंतर्गत नागरिकांमधील पोलीस नेमला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. यात नाव, पत्ता, वय, आधारकार्ड क्रमांक, नोकरीचा तपशील, रक्तगट, आजाराचा संदर्भ याची माहिती भरावयाची    आहे. त्यानंतर संबधीत विभागाच्या पोलीस ठाण्यातून अर्ज केलेल्याला ओळखपत्र दिले जाईल. त्या पोलीस ठाण्याअंतर्गत ज्या ठिकाणी बंदोबस्तासाठी आवश्यकता असेल त्या ठिकाणी नियुक्त केलेल्यांना बंदोबस्तासाठी नेमण्यात येईल. यासाठी कुठलेही मानधन राहणार नाही, केवळ देशसेवा हाच उद्देश त्यामागे आहे. यात अनेक सुशिक्षीत युवक, शिक्षकवर्ग, माजी सैनिक सहभागी होत आहेत. विविध संघटना, राजकीय पक्ष यांनी यासाठी आपल्या कार्यकत्र्याना तयार केले आहे. तसे आवाहन    देखील करण्यात येत आहे.    भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी आपल्या कार्यकत्र्याना     जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.