आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

By Admin | Updated: May 30, 2017 15:31 IST2017-05-30T15:31:56+5:302017-05-30T15:31:56+5:30

नदीतील बंधा:यात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 28 रोजी सायंकाळी टोकरतलाव शिवारातील नदीपात्रात घडली.

The young man who went to bath, drowned in water and died | आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.30 - नदीतील बंधा:यात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 28 रोजी सायंकाळी टोकरतलाव शिवारातील नदीपात्रात घडली. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
टोकरतलाव गावातील युवक धनु हिरा जाधव (35) हे गावालगतच्या नदी पात्रात बांधण्यात आलेल्या बंधा:यात आंघोळीसाठी गेले होते. त्या ठिकाणच्या पात्राचा अंदाज न आल्याने जाधव हे खोल पाण्यात बुडाले. पोहतांना त्यांचा पाय देखील घसरल्याचे पोलिसात नमुद करण्यात आले आहे. याबाबत कनु हिरा जाधव (41) यांच्या खबरीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार वसावे करीत आहे.

Web Title: The young man who went to bath, drowned in water and died