शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून यंदाही दहा लाखाच्या टप्प्यात उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

नंदुरबार : खान्देशात यंदाही सर्वाधिक कारखाने व सर्वाधिक साखर उत्पादन नंदुरबार जिल्ह्यातच झाले. तीन कारखान्यांनी तब्बल नऊ लाख ५७ ...

नंदुरबार : खान्देशात यंदाही सर्वाधिक कारखाने व सर्वाधिक साखर उत्पादन नंदुरबार जिल्ह्यातच झाले. तीन कारखान्यांनी तब्बल नऊ लाख ५७ हजार ११३ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. यंदा खान्देशातील केवळ चारच कारखाने सुरू झाले होते. त्यापैकी नंदुरबार जिल्ह्यातील तीन कारखान्यांचा समावेश होता. दरम्यान, येत्या साखर हंगामासाठी ऊस लागवड वाढल्याने साखर उत्पादन देखील ११ लाख क्विंटलपेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तिन्ही साखर कारखान्यांनी नियोजन केेले आहे.

खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पूर्वी साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात खान्देशात सर्वाधिक साखर उत्पादन होत होते. परंतु कालांतराने धुळे जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने, जळगाव जिल्ह्यातील चार साखर कारखाने बंद पडल्याने साखर उत्पादन घटले. दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहिले असून दरवर्षी साखर उत्पादन घेत आहेत. यंदा देखील तिन्ही कारखान्यांतर्फे दहा लाखाच्या टप्प्यात साखर उत्पादन घेण्यात आले.

तिन्ही कारखाने नियमित सुरू

जिल्ह्यात पूर्वी केवळ शहादा येथील सातपुडा साखर कारखाना होता. त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला. कालांतराने त्याचे खाजगीकरण झाले. आता तो आयान शुगर लिमिटेड म्हणून ओळखला जातो, तर तिसरा साखर कारखाना हा नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना आहे. काही काळ वगळता हे तिन्ही साखर कारखाने नियमितपणे सुरू आहेत. खान्देशातील धुळे व जळगाव जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने बंद पडले असताना नंदुरबार जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने नियमितपणे सुरू असून उत्पादन देखील घेतले जात आहे.

दोन वर्षांपासून दहा लाखाचा टप्पा

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जवळपास दहा लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. यंदा नऊ लाख ५७ हजार क्विंटल, तर गेल्यावर्षी दहा लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादन झाले होते. यंदा सर्वाधिक साखर उत्पादन हे आयान शुगर कारखान्याने केले आहे. अवघे ७९ दिवस गाळप करून त्यांनी चार लाख ४३ हजार १३० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. त्याखालोखाल शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याने १५१ दिवस गाळप करून चार लाख ४६ हजार ३४५ क्विंटल साखर उत्पादन केले, तर आदिवासी साखर कारखान्याने १०९ दिवस गाळप करून एक लाख १४ हजार ७४५ क्विंटल साखर उत्पादन घेतले.

पुढील हंगामात मुबलक ऊस

गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पर्जन्यमान असल्याने जिल्ह्यात उसाची मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे येत्या हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. तिन्ही कारखाने गाळपाच्या पूर्वतयारीला जून महिन्यापासून सुरुवात करणार आहेत. त्यादृष्टीने कारखान्यांनी नियोजन केले आहे.

पुढील हंगामात जिल्ह्यात जवळपास २० हजार एकर क्षेत्रात ऊस उपलब्ध राहणार आहे. सातपुडा साखर कारखान्यातर्फे सभासद शेतकऱ्यांना ऊस लागवड व विविध किडी आणि रोगांसंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे.

कोरोनाचा परिणाम नाही

गेल्यावर्षी व यंदा देखील कोरोना काळातच साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा समारोप करण्यात आला होता. असे असले तरी कोरोनामुळे एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहिला नव्हता. नोंदीचा व बिगर नोंदीचा सर्व ऊस तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले गेले होते.