शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जगण्याचे वर्ष असल्याने नियमांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : यंदा कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून गणेशोत्सव साजरा करायचा आहे. हे वर्ष फक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : यंदा कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून गणेशोत्सव साजरा करायचा आहे. हे वर्ष फक्त जगण्याचे वर्ष असल्याने नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी येथे केले.
गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर येथे शांतता कमिटीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित होते. बैठकीला नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजित पाटील, पालिकेतील गटनेते प्रा.मकरंद पाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुमार, प्रा.लियाकतअली सैयद, एलसीबीचे निरीक्षक किशोर नवले उपस्थित होते.
या वेळी पंडित म्हणाले की, कोरोना विषाणू संक्रमणामुळे गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत सर्वधर्मियांचे सण हे घरी राहूनच साजरे झाले आहेत. यासाठी शासनाने ११ जुलैच्या नियमावलीनुसार उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. शहरात ३२ प्रतिबंधात्मक क्षेत्र असून याठिकाणी सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्याला परवानगी दिली जाणार नाही. २१ आॅगस्टपासून मोहरमला सुरुवात होत आहे. या कालावधीत मुस्लिम बांधवांनी घरी राहूनच उत्सव साजरा करावे, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीत सुपडू खेडकर, प्रा.लियाकतअली सैयद, प्रा.मकरंद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी तर आभार पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मानले.