शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

बर्डीपाडा येथे याहामोगी मातेचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील धामणदोरी यहामोगी मातेची महाशिवरात्रीनिमित्त यात्रा २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत भरविण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील धामणदोरी यहामोगी मातेची महाशिवरात्रीनिमित्त यात्रा २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत भरविण्यात येत असून, परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.बर्डीपाडा येथील डोंगरावरील धामणदोरी येथे आदिवासी समाजाची कुलदैवता यहामोगी माता प्रकट झाल्यापासून अद्यापपर्यंत प्रत्येक वर्षी आदिवासी रूढी परंपरेप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येऊन येथील पुजारी जामसिंग गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.२१ फेब्रुवारीपासून यात्रा भरविण्यात येत आहे. या वेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. २० रोजी सायंकाळी भजन कीर्तनास प्रारंभ होणार आहे तर २१ रोजी १२ वाजेला शिवपूजा करण्यात येवून दोन दिवस रात्री सोंगाडड्या पार्टीचे आयोजन केले आहे. २२ रोजी दुपारी चार वाजता मातेची हेलादाब रितीरिवाजानुसार विधिवत पूजा करण्यात येणार आहे.गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या धामणदोरी डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत साडेसात हजार फूट उंचीवरील याहामोगी देवमोगरा मातेचे मंदिर भक्तांचे आकर्षण आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना डोंगरमाथ्यावरील तीन हजार उंच पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्यांची देखभाल व रस्त्यांची दुरुस्ती गावातील भाविकांद्वारे करण्यात येते. ढोरपाडा गावापासून यात्रेच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी मातीचा रस्ता असून, भाविकांना येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे शासनाकडून मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी पुजारी जामसिंग गावीत व भाविकांनी केली आहे.परिसरातील भाविकांनी याहामोगी माता, दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान पुजारी जामसिंग गावीत यांनी केले आहे.