शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

नवसंकल्पनेला वाव : नवापूर तालुक्यातील फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 8:06 AM

आॅक्टोबर २०१६ मध्ये वडसत्रा ता़ नवापूर सत्यानंद गावीत यांच्यासह शेतकऱ्यांच्या पुढाकाराने याहा आदिवासी नवापूर फार्मर्स प्रो

भूषण रामराजे

नंदुरबार : नवीन प्रयोग करण्याची तयारी असलेल्या शेतकरी सभासदाला बळ देण्यासाठी सहकार्य हेच फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनीचे मुख्य ध्येय आहे, कारण प्रयोगातून शेतकऱ्याला नवीन क्षितीज गाठता येईल, असा विश्वास व्यक्त करतात सत्यानंद गावीत. दोन वर्षात अ दर्जा प्राप्त करणाºया याहा शेतकरी नवापूर फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनीचे संचालक असलेल्या सत्यानंद गावीत यांच्या पुढाकाराने आज नवापूर तालुक्यातील १३ गावातील शेतकरी आर्थिक उन्नतीच्या मार्गाला लागले आहेत.

आॅक्टोबर २०१६ मध्ये वडसत्रा ता़ नवापूर सत्यानंद गावीत यांच्यासह शेतकºयांच्या पुढाकाराने याहा आदिवासी नवापूर फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनीची स्थापना करण्यात आली होती़ १३ गावे ३५५ शेतकरी आणि त्यांची साधारण १ हजार एकर शेतीक्षेत्र असलेली ही कंपनी आजघडीस अ‍ॅग्रीकल्चर इंडस्ट्रीजमध्ये पुढे येत आहे़ आपण कंपनीचे मालक होऊ शकतो, या एकविचाराने सुरु झालेल्या या कंपनीद्वारे कमी खर्चात जादा उत्पादन कसे घेता येईल यावर अधिक भर देण्यात येतो़ प्रारंभी शेतकºयांचा मोठा खर्च हा बियाणे खरेदीत होत गटशेतीतून बियाणे निर्मिती करत शेतकºयांना वाटप केले होते़ हक्काचे दर्जेदार बियाणे प्राप्त झाल्यावर मग शेतकºयांनी उत्पादित केलेला शेतमाल खरेदी करून गुजरात आणि मुंबईच्या बाजारपेठेत विक्री करण्याचा धडाका या कंपनीने सुरु केला़ जीआय मानांकन प्राप्त असलेली देशी तूरडाळ, भेंडी, बेबीकॉर्न, मशरूम या उत्पादनांची ब्रँड स्वरूपात विक्री करण्याचा मान ह्या कंपनीला मिळाल्याने त्यांना अ दर्जाही देण्यात आला़ शेतीमालाची योग्य ती सफाई करण्यासाठी वडसत्रा येथे १० लाख रूपये खर्चून क्लिनिंग आणि ग्रिडींग युनिट तयार करण्यात आले आहे़ यातून स्वच्छ असे धान्य बाजरात आणले गेले होते़

मालाचा दर्जा टिकून रहावा म्हणून शेतकºयांनी सात लाख रूपये खर्च करून तयार केलेल्या शेडमध्ये या धान्याची पॅकिंग करण्यात येते़ गेल्या दोन वर्षात या कंपनीने ३५५ शेतकºयांसह सुमारे ३०० कामगारांना रोजगार दिला आहे़ सध्या येथे राईसमीलचे काम अंतिम टप्प्यात असून याहा आदिवासी हा राईसमील ब्रँड बाजारात आणण्याच्या हालचानींना वेग आला आहे़नोंदणीकृत कंपनीवडसत्रा, उचीशेवडी, लहान कडवान, गंगापूर, लहान सावरट, मोठी सावरट, सुळी, केडापाडा, खेकडा, झामणझर, मोरथवा आणि पाटी या गावातील शेतकरी हे दोन वर्षांपूर्वी गटशेती करत होते़ यातून येणारी पारंपरिक तूर आणि तांदूळच्या उत्पादनसी भाजीपाला पिकांची विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता़ हा माल बाहेर विक्री केल्यानंतरही प्रत्येकाला मर्यादित उत्पन्न येत होते़ या उत्पन्नात वाढ कशी करता येईल असा विचार सुरु असताना सत्यानंद गावीत यांनी फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीची संकल्पना मांडली होती़ याला शेतकºयांना हमी देत काहीसा खर्च करून शेतीतज्ञ डॉ़ गजानन डांगे, आत्माचे तत्कालीन संचालक मधुकर पन्हाळे, कृषी अधिकारी सुभाष साळवे, सहायक प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई आणि अश्विनी कुमार यांच्या मदतीने ही कंपनी नोंदणीकृत करण्यात आली़

शेतकºयांना दर महिन्याला डिव्हीडंट स्वरूपातील नफा बँक खात्याद्वारे दिला जातो़ दर वर्षी तीन लाख रूपयांचे बियाणे कंपनीद्वारे तयार करून शेतकºयांना दिले जाते़ वर्षभरापासून कंपनीने १८ एकरात उत्पादित केलेल्या वांग्यांना गुजरात राज्यात मागणी आहे़ सत्यानंद गावीत यांच्यासोबतच गुलाबसिंग वसावे, ईश्वर गावीत, कृष्णा गावीत, देविदास पाडवी, किसन वसावे व जेमजी गावीत हे संचालक म्हणून कार्यरत आहेत़ वर्षाला साधारण दोन कोटी रूपयांचा व्यवसाय असलेल्या या कंपनीतून भाजीपाला आणि धान्याची ब्रँडिंग करण्याचे ध्येय शेतकºयांचे आहे़जिंकण्याचा एकविचार सैन्याला एकसंघ ठेवू शकतो, मग आपण तर शेतकरी आहोत, प्रगतीसाठी एकत्र आलो तर बदल नक्कीच हा विचार दोन वर्षांपूर्वी शेतकºयांमध्ये पेरला होता़ त्याचे फळ म्हणजे फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनीचे ३५५ शेतकरी मालक झाले आहेत़ याच विचाराने ही वाटचाल सुरु राहणार आहे़-सत्यानंद गावीत, संचालक फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनी, वडसत्रा, नवापूऱ 

टॅग्स :FarmerशेतकरीDhuleधुळेfarmer suicideशेतकरी आत्महत्या