नवसंकल्पनेला वाव : नवापूर तालुक्यातील फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 08:07 IST2018-11-16T08:06:53+5:302018-11-16T08:07:35+5:30

आॅक्टोबर २०१६ मध्ये वडसत्रा ता़ नवापूर सत्यानंद गावीत यांच्यासह शेतकऱ्यांच्या पुढाकाराने याहा आदिवासी नवापूर फार्मर्स प्रो

Worship of innovation: Farmers Production Company in Navapur taluka | नवसंकल्पनेला वाव : नवापूर तालुक्यातील फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनी

नवसंकल्पनेला वाव : नवापूर तालुक्यातील फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनी

भूषण रामराजे

नंदुरबार : नवीन प्रयोग करण्याची तयारी असलेल्या शेतकरी सभासदाला बळ देण्यासाठी सहकार्य हेच फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनीचे मुख्य ध्येय आहे, कारण प्रयोगातून शेतकऱ्याला नवीन क्षितीज गाठता येईल, असा विश्वास व्यक्त करतात सत्यानंद गावीत. दोन वर्षात अ दर्जा प्राप्त करणाºया याहा शेतकरी नवापूर फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनीचे संचालक असलेल्या सत्यानंद गावीत यांच्या पुढाकाराने आज नवापूर तालुक्यातील १३ गावातील शेतकरी आर्थिक उन्नतीच्या मार्गाला लागले आहेत.

आॅक्टोबर २०१६ मध्ये वडसत्रा ता़ नवापूर सत्यानंद गावीत यांच्यासह शेतकºयांच्या पुढाकाराने याहा आदिवासी नवापूर फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनीची स्थापना करण्यात आली होती़ १३ गावे ३५५ शेतकरी आणि त्यांची साधारण १ हजार एकर शेतीक्षेत्र असलेली ही कंपनी आजघडीस अ‍ॅग्रीकल्चर इंडस्ट्रीजमध्ये पुढे येत आहे़ आपण कंपनीचे मालक होऊ शकतो, या एकविचाराने सुरु झालेल्या या कंपनीद्वारे कमी खर्चात जादा उत्पादन कसे घेता येईल यावर अधिक भर देण्यात येतो़ प्रारंभी शेतकºयांचा मोठा खर्च हा बियाणे खरेदीत होत गटशेतीतून बियाणे निर्मिती करत शेतकºयांना वाटप केले होते़ हक्काचे दर्जेदार बियाणे प्राप्त झाल्यावर मग शेतकºयांनी उत्पादित केलेला शेतमाल खरेदी करून गुजरात आणि मुंबईच्या बाजारपेठेत विक्री करण्याचा धडाका या कंपनीने सुरु केला़ जीआय मानांकन प्राप्त असलेली देशी तूरडाळ, भेंडी, बेबीकॉर्न, मशरूम या उत्पादनांची ब्रँड स्वरूपात विक्री करण्याचा मान ह्या कंपनीला मिळाल्याने त्यांना अ दर्जाही देण्यात आला़ शेतीमालाची योग्य ती सफाई करण्यासाठी वडसत्रा येथे १० लाख रूपये खर्चून क्लिनिंग आणि ग्रिडींग युनिट तयार करण्यात आले आहे़ यातून स्वच्छ असे धान्य बाजरात आणले गेले होते़

मालाचा दर्जा टिकून रहावा म्हणून शेतकºयांनी सात लाख रूपये खर्च करून तयार केलेल्या शेडमध्ये या धान्याची पॅकिंग करण्यात येते़ गेल्या दोन वर्षात या कंपनीने ३५५ शेतकºयांसह सुमारे ३०० कामगारांना रोजगार दिला आहे़ सध्या येथे राईसमीलचे काम अंतिम टप्प्यात असून याहा आदिवासी हा राईसमील ब्रँड बाजारात आणण्याच्या हालचानींना वेग आला आहे़
नोंदणीकृत कंपनी
वडसत्रा, उचीशेवडी, लहान कडवान, गंगापूर, लहान सावरट, मोठी सावरट, सुळी, केडापाडा, खेकडा, झामणझर, मोरथवा आणि पाटी या गावातील शेतकरी हे दोन वर्षांपूर्वी गटशेती करत होते़ यातून येणारी पारंपरिक तूर आणि तांदूळच्या उत्पादनसी भाजीपाला पिकांची विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता़ हा माल बाहेर विक्री केल्यानंतरही प्रत्येकाला मर्यादित उत्पन्न येत होते़ या उत्पन्नात वाढ कशी करता येईल असा विचार सुरु असताना सत्यानंद गावीत यांनी फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीची संकल्पना मांडली होती़ याला शेतकºयांना हमी देत काहीसा खर्च करून शेतीतज्ञ डॉ़ गजानन डांगे, आत्माचे तत्कालीन संचालक मधुकर पन्हाळे, कृषी अधिकारी सुभाष साळवे, सहायक प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई आणि अश्विनी कुमार यांच्या मदतीने ही कंपनी नोंदणीकृत करण्यात आली़

शेतकºयांना दर महिन्याला डिव्हीडंट स्वरूपातील नफा बँक खात्याद्वारे दिला जातो़ दर वर्षी तीन लाख रूपयांचे बियाणे कंपनीद्वारे तयार करून शेतकºयांना दिले जाते़ वर्षभरापासून कंपनीने १८ एकरात उत्पादित केलेल्या वांग्यांना गुजरात राज्यात मागणी आहे़ सत्यानंद गावीत यांच्यासोबतच गुलाबसिंग वसावे, ईश्वर गावीत, कृष्णा गावीत, देविदास पाडवी, किसन वसावे व जेमजी गावीत हे संचालक म्हणून कार्यरत आहेत़ वर्षाला साधारण दोन कोटी रूपयांचा व्यवसाय असलेल्या या कंपनीतून भाजीपाला आणि धान्याची ब्रँडिंग करण्याचे ध्येय शेतकºयांचे आहे़
जिंकण्याचा एकविचार सैन्याला एकसंघ ठेवू शकतो, मग आपण तर शेतकरी आहोत, प्रगतीसाठी एकत्र आलो तर बदल नक्कीच हा विचार दोन वर्षांपूर्वी शेतकºयांमध्ये पेरला होता़ त्याचे फळ म्हणजे फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनीचे ३५५ शेतकरी मालक झाले आहेत़ याच विचाराने ही वाटचाल सुरु राहणार आहे़
-सत्यानंद गावीत, संचालक फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनी, वडसत्रा, नवापूऱ
 

Web Title: Worship of innovation: Farmers Production Company in Navapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.