वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:42 IST2020-06-17T12:41:55+5:302020-06-17T12:42:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद, मोडसह परिसरातील खरवड, तºहावद, खेडले, करणखेडा व मोरवड आदी गावांमध्ये वादळी ...

Work to streamline power supply on the battlefield | वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर

वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद, मोडसह परिसरातील खरवड, तºहावद, खेडले, करणखेडा व मोरवड आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने विद्युत वितरण कंपनीचे २७ पोल व सहा रोहित्र जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून या गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामनाही करावा लागला. दरम्यान, वीज वितरण कंपनीने तत्काळ कामास प्राधान्य देत दिवस रात्र करून मंगळवारी या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत कार्यान्वित केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान काही ठिकाणी अद्यापही विद्युत पोल व रोहित्र बसविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत असल्याचे बोरद विद्युत उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता विलास गुरव यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतशिवारालाही वीजपुरवठा कार्यान्वित केला जाईल. यासाठी उपकार्यकारी अभियंता सचिन काळे, लाईनमन राऊत, जे.बी. कोळी, ए.एस. गिरणार, बी.के. पाडवी, एस.के. राठोड, बी.व्ही. पाटील, आनंद कानडे आदींचे सहकार्य लाभत असल्याचे कनिष्ठ अभियंत्यांनी सांगितले.
तसेच पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, तहसीलदार पंकज लोखंडे, वीज वितरण कंपनीने सचिन काळे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांनीही या परिसरात भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना मान्यवरांनी दिल्यानंतर पंचनामे करण्यात येत आहे.

Web Title: Work to streamline power supply on the battlefield