शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवक सैनिकाप्रती व्यक्त कराया ‘आदरभाव’ जमला सारा गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशसेवा करणाऱ्या आपल्या सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करीत सेवानिवृत्त झालेल्या सैनिक भूमीपुत्राचा आसाणे, ता.नंदुरबार येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशसेवा करणाऱ्या आपल्या सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करीत सेवानिवृत्त झालेल्या सैनिक भूमीपुत्राचा आसाणे, ता.नंदुरबार येथील गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. गावातून मिरवणूक काढत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.आसाणे येथील अनेक युवक देशसेवा करण्यासाठी सैन्यदलाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. त्यापैकीच एक असलेले महेशकुमार पंडित पाटील हे १७ वर्षांची सेवा बजावून सैन्य दलातून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांचे गावात आगमन झाल्यावर ग्रामस्थांनी त्यांची भव्य शोभायात्रा काढली. सजविलेल्या उघड्या जीपमधून गावभर त्यांची मिरवणूक काढली. जीपवर स्वत: जवान महेशकुमार यांच्यासह त्यांची आई व पत्नी देखील होते. घरोघरी त्यांची औक्षण करण्यात आले. ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सेवापूर्ती गौरव करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, राष्टÑवादीचे डॉ.अभिजीत मोरे, बाजार समितीचे माजी सभापती युवराज पाटील, उपसभापती हरिदादा पाटील, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, अखिल भारतीय लोणी मराठा समाजाचे मनोज शेलार, सुरेश भदाणे, ज्ञानेश्वर पाटील, भरत सावंत, नंदुरबारचे नगरसेवक रघुवंशी, धमेंद्र माळी, विशाल माळी, जगदीश सोनवणे, उमेश पांढारकर, राजेंद्र धनगर, वन परिमंडळ अधिकारी पी.एस.पाटील, मुख्याध्यापक एल.एच.पाटील, रवींद्र कंचन पाटील, पंढरीनाथ पाटील, समाधान पाटील, रवींद्र के.पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी विजय चौधरी, अभिजीत मोरे, गजेंद्र शिंपी, हरिदादा पाटील, सुरेश भदाणे, धर्मेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला महेश पाटील यांनी उत्तर देत प्रत्येक जवानाविषयी देशवासीयांची ही भावना राहिली तर प्रत्येक तरुण देशसेवेत जाण्यासाठी नक्कीच तयार होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी आपल्या १७ वर्षांच्या कार्यकाळातील अनुभव कथन केले. सूत्रसंचलन हर्षल पाटील यांनी केले. ग्रामस्थ, विविध संस्था, संघटनांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांचा उत्साह यावेळी मोठ्या प्रमाणावर दिसून आला. कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय लोणी मराठा समाज, दगडू देव युवा मित्र मंडळ, बजरंग मित्र मंडळ, पवनपूत्र मित्र मंडळ, जयभद्रा मित्र मंडळ आणि ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले.