शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

बामखेडा गावात कोरोना आला कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:46 IST

हितेश पटेल । लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : एकीकडे जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा शहरातील कोरोना संक्रमित रुग्ण बरे ...

हितेश पटेल ।लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : एकीकडे जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा शहरातील कोरोना संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी परतत असतानाच बामखेड्यासारख्या खेडेगावात व ग्रामीण भागात नव्याने रुग्ण सापडला असून कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासनामार्फत घेण्यात आहे. आष्टे, ता.नंदुरबार नंतर बामखेडा, ता.शहादा येथे कोरोनाने प्रवेश केल्याने प्रशासनला आता ग्रामीण भागात जास्त लक्ष केंद्रीत करुन खबरदारीचे उपाय योजावे लागतील. कोरोनाने बामखेडा गावात प्रवेश कसा केला? याचे गूढ अद्यापही कायम आहे.बामखेडा त.त., ता.शहादा येथील एक ४५ वर्षीय व्यक्ती नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात किडनी आजारासंबंधी उपचार घेत असताना तपासणी केली असता कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला. त्यामुळे प्रशासनाने रुग्ण जरी बाहेरगावी (नाशिक) असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांच्या निकटवर्तीयांना व त्याच्यावर उपचार करणाऱ्या तीन स्थानिक डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रुग्ण राहत असलेला परिसर व गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.बामखेडा ते नाशिक व्हाया धुळे...संबंधित व्यक्तीला पोटाचा त्रास होत असल्याने सुरुवातीला दोन दिवस गावातील स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले. त्यानंतर वडाळी, ता.शहादा येथील एका डॉक्टरकडे चार दिवस उपचार केल्याचे समजते. पुढील उपचारासाठी धुळे येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाल्यानंतर तपासणीअंती किडनी संबंधित आजार असल्याचे कळाले. त्यानंतर ९ मे रोजी उपचारासाठी नाशिक येथे एका रुग्णालयात रवाना झाल्यानंतर तेथेच उपचार सुरू झाले. उपचारादरम्यान १५ मे रोजी या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. असे असले तरी नेमकी संसर्गाची लागण कुठून झाली हा मात्र प्रशासनासमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.डिस्चार्ज मिळण्याअगोदरचअहवाल पॉझिटीव्हनाशिक येथील एका मोठ्या रुग्णालयात सहा दिवस उपचार घेतल्यानंतर संबंधित रुग्णाला अहवाल प्राप्त झाला. त्याच दिवशी डिस्चार्ज मिळणार होता, असे समजते. तत्पूर्वीच तापसणीअंती कोरोना संक्रमित झाल्याचा अहवाल आल्याने सारेच अचंबित झाले. असे असले तरी संबंधित रुग्ण हा शेतकरी असूनही त्याची बाहेरगावी जाण्याची कुठलीहीही ट्रॅव्हल हिस्ट्री अद्याप प्राप्त झालेली नाही.अफवांवर विश्वास ठेवू नयेशनिवारी कोरोनाग्रस्त रुग्ण मयत झाल्याची बातमी पंचक्रोशीत सोशल मिडियावर वाºयासारखी पसरली होती. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असून लवकरच डिस्चार्च देण्यात येईल. अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी यांनी केले आहे.प्रशासनाने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातही सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आले होते. बामखेडा गावात तर ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने सोशल डिस्टन्सिंगचे पुरेपूर पालन करण्यात येऊन उपाययोजना करण्यात आल्या. शासकीय नियमाप्रमाणे सर्वकाही व्यवहार सुरळीत असताना संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण नेमकी कुठून झाली? संबंधित कोरोनाग्रस्त रुग्ण हा शेतकरी कुटुंबातील शेती करणारा आहे. त्यामुळे त्याचा इतरांशी कुठेही संबंध आला नसतानाही गावात कोरोना शिरलाच कसा? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. कोरोना कनेक्शनचे तर्क ज्याच्या त्याच्या मतानुसार लावले जात आहे.