शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील धबधबे ओसंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : सातपुड्याच्या दुर्गम व अती दुर्गम भागात संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर : सातपुड्याच्या दुर्गम व अती दुर्गम भागात संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून दऱ्या खोºयातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत़ शुक्रवारी नद्यांसह छोट्या-मोठ्या नाल्यांनाही पूर आल्याचे दिसून आले होते़
शुक्रवारी वालंबा, दहेल, डाब, काठी, आसनबारीपाडा यासह विविध ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत होते़ फेसाळणाºया या धबधब्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दुर्गम भागात आल्याचेही यावेळी दिसून आले़ दुर्गम भागातील दहेल नदीवरील धबधबा पर्यटकांसोबत मोठे आकर्षण आहे़ शुक्रवारी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने हा धबधबा ओसंडून वाहू लागला होता़ खोल हिरव्यागार डोंगरावरून दरीत कोसळणारा जलप्रपात पाहण्यासाठी लगतच्या गुजरात राज्यातून अनेकजण आल्याची माहिती देण्यात आली़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी पर्यटनस्थळे बंद असल्याने शनिवार आणि रविववार अशा जोडून सुट्यांच्या दिवशी गुजरात राज्याच्या विविध भागातील पर्यटक सातपुड्यात येत आहेत़ यात नर्मदा काठावर बोटींग आणि बार्जमधून फेरफटका मारणारेही दिसून येत आहेत़ सोयी सुविधांचा अभाव असला तरीही गेल्या काही वर्षात वर्षापर्यटनासाठी सातपुड्याला पसंती दिली जात आहे़ लांबवरून पर्यटक येथवर येत आहेत़ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी झाली असली तरी नवीन पर्यटकांची संख्याही अधिक आहे़
यात प्रामुख्याने नंदुरबार जिल्हा तसेच लगतच्या जिल्ह्यातून आणि गुजरातमधील पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याची माहिती देण्यात येत आहे़ यामुळे स्थानिक किरकोळ खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय आणि इतर व्यवसायांना लाभ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़