शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडा संवर्धन मोहिमेतून दूर होणार पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील दुर्गम भागातील गावे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी सातपुड्यातील युवक कार्यकर्ते, लोकसमन्वय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यातील दुर्गम भागातील गावे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी सातपुड्यातील युवक कार्यकर्ते, लोकसमन्वय प्रतिष्ठान आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या प्रयत्नाने सातपुडा संवर्धन मोहिम सुरु केली आहे़ या मोहिमेंतर्गत सातपुड्यातील पाणीटंचाईबाबत प्रशासनाला पाठपुरावा केला जाणार आहे़धडगाव तालुक्यातील नवे तोरणमाळच्या बुरुमपाड्यात पाणी टंचाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ विहिरी आटल्याने डोंगरांवरील पायवाटेने दरीत उतरुन महिला हंडाभर पाणी आणण्यासाठी दररोज सात किलोमीटरपर्यंत पायपीट करुन पाणी आणत आहेत़ पाळीव गुराढोरांना पाणी पाणी मिळावे म्हणून सात किलोमीटरपर्यंत पशुपालक जात आहेत़सातपुड्यातील कुयरीडाबर ता़ तळोदा येथे गाढवावरुन पाणी पोहोचवण्याची वेळ शासनावर येऊनही दुर्गम भागातील स्थिती बदलेली नाही़ तीव्र पाणी टंचाई असलेल्या कुयरीडाबर येथे आजही रस्ता नाही़ अशा स्थितीत कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे़ यात शासनाकडून हात धुवा अशी जागृती सुरु आहे़ परंतू जिथे प्यायला पाणी नाही, तेथे हात धुवायला पाणी आणणार तरी कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे़ यासाठी शासनाकडे लोकसंघर्ष मोर्चा, लोकसमन्वय प्रतिष्ठान पाठपुरावा करत आहेत़ यात सातपुड्यातील त्या-त्या गावातील सामूहिक वन व्यवस्थापन समितीनेही पुढच्या उन्हाळ्यात गांव पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत़ या सर्वांना एक दिशा मिळावी यासाठी सातपुडा संवर्धन मोहिम सुरु करण्यात आली आहे़मोहिमेंतर्गत सातपुड्यातील जंगल पुन्हा उभे करुन सातपुड्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी युवा कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, वन कार्यकर्ते यांनी योगदान देण्याचे तसेच तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन, संकल्पना मांडण्याचे लोकसंषर्घच्या प्रतिभा शिंदे यांनी कळवले आहे़ दरम्यान सातपुड्यातील या टंचाईवर मात करण्यासाठी वस्तूंच्या स्वरुपातही दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे त्यांनी म्हटले आहे़