शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

शुभारंभाआधीच जलकुंभाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नवीनच बांधकाम करण्यात आलेल्या जलकुंभातून शनिवारपासून गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नवीनच बांधकाम करण्यात आलेल्या जलकुंभातून शनिवारपासून गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र या जलकुंभात पाणी भरले असता तो चारही बाजूंनी लिकेज झाल्याने वरून पाणी पडू लागल्याने एकच धावपळ उडाली. नवीन बांधलेला जलकुंभ सुरुवातीलाच लिकेज झाल्याने हे काम किती निकृष्ट दर्जाचे असेल याचा अंदाज येतो.सविस्तर वृत्त असे की, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग नंदुरबार यांच्या देखभाल दुरुस्ती या योजनेअंतर्गत प्रकाशा येथे सुमारे २४ लाख रुपये खर्च करून नवीन जलकुंभ बांधण्यात आला. हे काम महिनाभरापूर्वी पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रकाशा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. उपअभियंता पाणीपुरवठा शहादा व शाखा अभियंता पाणीपुरवठा पंचायत समिती शहादा यांच्या देखरेखीखाली हे काम करण्यात आले आहे. मात्र प्रकाशा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाल्यानंतर ग्रामपंचायतीने शनिवारपासून या जलकुंभातून गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी उपसरपंच भरत पाटील यांनी दोन दिवस त्याठिकाणी थांबून जुन्या जलकुंभाची जलवाहिनी नवीन जलकुंभाकडे वळवून ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र जसजसे नवीन जलकुंभात पाणी पडू लागले तसतसा जलकुंभ चारही बाजूने लिकेज सुरू झाले. पूर्ण भरल्यानंतर वरपासून खालपर्यंत त्या टाकीचा चारी बाजूंनी ठिकाणी पाणी खाली पडू लागले. वरून खाली पाण्याचे तषारे उडू लागले. यामुळे आजूबाजूच्या घरांवर पाणी पडू लागल्याने घरांना धोका निर्माण झाला. विशेषत: पहिल्याच दिवशी गळती लागल्याने हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसून आले. विशेष म्हणजे जलकुंभाची पूर्ण चाचणी बाकी असताना संबंधित ठेकेदाराला पैसे अदा झाल्याचे कळते. जर कामच बरोबर नसेल तर कामाचे पैसे अदा झालेच कसे? हा प्रश्नही सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे. या चुकीच्या कामामुळे ग्रामस्थांना गेल्या दोन दिवसापासून पाण्यासाठी अडचण येत आहे. पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे आणि पहिल्या दिवशी झालेल्या लिकेजमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. जर या कामासाठी दोन अभियंत्यांची नियुक्ती असताना हे काम असे झालेच कसे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तेव्हा वरिष्ठांनी याची दखल घेत या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.प्रकाशा येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग नंदुरबार यांच्या जिल्हा देखभाल दुरुस्ती योजनेअंतर्गत नवीन जलकुंभ उभारण्यात आला आहे. शनिवारी शुभारंभ करण्यासाठी जलकुंभात पाणी टाकले असता चारही बाजूने गळताना दिसून आला. जलकुंभाचा तळ, मध्यभागी चार ते पाच ठिकाणी गळती आहे. यामुळे हे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे हे यावरून कळते. जर यावर निरीक्षण करणारे उपअभियंता व शाखा अभियंता होते तर मग हे काम ठेकेदाराकडून झाले कसे. म्हणून या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.-रामचंद्र पाटील, माजी जि.प. सदस्य, प्रकाशा.