शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआर सुरू होऊनही वेटींग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू झाली, परंतु मायक्रोबॉयलॉजिस्टची कमतरता, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, आरएनए वेगळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू झाली, परंतु मायक्रोबॉयलॉजिस्टची कमतरता, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, आरएनए वेगळे करण्याचे उपकरण यांच्या अभावामुळे ही प्रयोगशाळा उद्घाटनानंतर तिसºया दिवशीही पुर्ण क्षमतेने काम करीत नसल्याची स्थिती आहे. पुर्ण क्षमतेने अर्थात दररोज १२०० स्वॅब अहवाल तपासणीच्या कामास पुढील आठवडा उजाडणार आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत तब्बल ७१७ अहवाल वेटींगवर होते.
नंदुरबारातील कोरोना अहवाल तपासणीस धुळे प्रयोगशाळेत लागणारा उशीर लक्षात घेता नंदुरबारातही अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी होत होती. दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी ही प्रयोगशाळा येथे मंजूर करून आणली. परंतु प्रत्यक्षात उपकरणे यायला आॅगस्ट उजाडला आणि प्रत्यक्षात प्रयोगशाळा सुरू होण्यास १५ आॅगस्ट उजाडला. साधारणत: दीड कोटी रुपये खर्च करून ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. परंतु प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांचा अभाव आणि इतर तांत्रिक बाबी यामुळे या प्रयोगशाळेतील काम अद्यापही पुर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना स्वॅब अहवालांची प्रतिक्षा वाढतच चालली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तब्बल ६०० पेक्षा अधीक स्वॅब वेटींगवर राहत आहे. मंगळवारी दुपारी ही संख्या ७१७ पर्यंत गेली होती.
१०० च्या आतच तपासणी
सद्यस्थितीत आरटीपीसीआर प्रयोगशाळेत केवळ ५० ते १०० स्वॅब तपासणी होत आहे. नवीन सुरू झालेली प्रयोगशाळा, नवीनच प्रशिक्षीत असलेले कर्मचारी यामुळे सर्व काळजी घेऊन आणि खात्री करूनच स्वॅब तपासणी केली जात आहे. येथील अहवाल पडताळून घेतल्यानंतरच ते जाहिर करण्यात येत आहे. हळूहळू या ठिकाणी स्वॅब तपासणी वाढविण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत पुर्ण क्षमतेने प्रयोगशाळेत तपासणी होणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी.सातपुते यांनी दिली.
स्थानिक कर्मचाºयांना प्रशिक्षण
आरटीपीसीआर प्रयोग शाळेत १५ ते २० कर्मचाºयांची आवश्यकता असते. त्यानुसार सद्यस्थितीत १५ स्थानिक कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. ते सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालयातील कर्मचारी आहेत. त्यांना गेल्या १५ दिवसात आवश्यक ते प्रशिक्षण दिले गेले आहे.
सुरुवातीला धुळे प्रयोग शाळेत तपासलेले अहवाल पुन्हा तपासणीसाठी येथे पाठविण्यात येत होते. तेथील प्रयोगशाळेतील निष्कर्ष व येथील निष्कर्ष यांची पडताळणी केली जात होती. त्यात ९० टक्के निष्कर्ष बरोबर निघाल्याने प्रशिक्षीत कर्मचाºयांना आत्मविश्वास आल्याने आता ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.
मायक्रोबॉयलॉजिस्ट दाखल
प्रयोगशाळेची मुख्य धूरा सांभाळणारे अधिकारी हे मायक्रोबॉयलॉजिस्ट असतात. वैद्यकीय महाविद्यालयातच त्यांची नियुक्ती असते. त्यामुळे नंदुरबारातील प्रयोग शाळेसाठी इतर जिल्ह्यातून संबधीत तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले.
धुळ्यातील संबधीत तज्ज्ञ हे धुळे प्रयोगशाळेसाठी आरक्षीत आहेत. त्यामुळे नंदुरबारातील प्रयोगशाळेसाठी बीड येथून हे तज्ज्ञ मागवावे लागले आहेत. सोमवारी सायंकाळी ते येथे दाखल झाले. मंगळवारी त्यांनी पदभार सांभाळला.
आरएनए अलगीकरण उपकरणही झाले दाखल
प्रयोगशाळेत आरएनए अलगीकरण उपकरणाची कमरता होती. आता ते देखील दाखल झाले आहे. या उपकरणातून स्वॅबमधून आरएनए वेगळा केला जातो. ते देखील उपलब्ध झाल्याने कामाला गती येणार आहे.

मंगळवारी दुपारपर्यंत तब्बल ७१७ अहवाल वेटींगवर होते. त्यात सर्वाधिक अहवाल हे नंदुरबार व शहादा तालुक्यातील आहेत. नंदुरबार तालुक्यातील २५१ इतके होते. शहादा तालुक्यातील २६७, तळोदा तालुक्यातील ९६, नवापूर तालुक्यातील ८३, अक्कलकुवा तालुक्यातील १६, धडगाव तालुक्यातील एकही नाही तर निझर, शिरपूर, निजामपूर येथील चार अहवाल वेटींगवर होते.
४नंदुरबारात अहवाल वेळेवर येत नसल्याने अनेक रुग्ण थेट सुरत येथे जाऊन खाजगी लॅबमध्ये तपासणी करून घेत आहेत. तेथेच उपचार घेऊन तेथूनच बरे होऊन येत असल्याचेही चित्र आहे.