शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरणासाठी मतदारयादीचा सहारा- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:33 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, महेश सुधळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ. भारुड म्हणाले, प्रत्येक तालुक्यासाठी दोन पथके तयार करून त्यांच्यामार्फत शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी गावातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घ्यावे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने समन्वयाने अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होईल, याचे नियोजन करावे. १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याने मतदारयादीचा उपयोग करून पात्र व्यक्तींची नोंदणी करण्यात यावी.

ग्रामीण भागात ॲण्टिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. प्रत्येक फिरत्या पथकाद्वारे दिवसाला किमान १०० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात. गावात नव्याने बाधित आढळल्यास त्याला त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे. बाधितांची संख्या अधिक असल्यास त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल करावे. अधिक बाधित असलेल्या गावात उपघटना व्यवस्थापकांनी भेट देऊन प्रत्येक बाधित व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात राहील, याची खात्री करावी.

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी कोविड सेंटरला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेची माहिती घ्यावी. कोविड केअर सेंटरसाठी कंत्राटी परिचारिकांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी. कोरोना चाचण्यांमध्ये निरंतरता राहावी, यासाठी चाचण्यांच्या कीटचे व्यवस्थापन नीटपणे करावे. ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात लसीकरण शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत असून येत्या काळात प्रत्येक गावात या प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात येईल, असे गावडे यांनी सांगितले.

बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.