शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

केळीसाठी कंपन्यांची तळोदा तालुक्यात भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतकऱ्यांची केळी ओमान आणि अफगाणिस्तानात रवाना झाली होती. यातून शेतकऱ्यांना दिशा मिळत असून ...

बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतकऱ्यांची केळी ओमान आणि अफगाणिस्तानात रवाना झाली होती. यातून शेतकऱ्यांना दिशा मिळत असून अनेक शेती कंपन्यांचे प्रतिनिधी केळी खरेदीसाठी बोरद व मोड परिसरात भेटी देत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढीने त्रस्त

शहादा : तालुक्यातील ग्रामीण भागात खाद्यतेल व डाळी सोबतच इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव किराणा व्यावसायिकांनी मनमानी पद्धतीने वाढविल्याचे प्रकार सुरु आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासनाने तालुक्यातील विविध भागात दुकानदारांना समज देत केलेली दरवाढ मागे घेण्याचे आदेश देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मोड जिल्हा परिषद केंद्र शाळेत लसीकरण केंद्र

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील मोड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत कोरोना लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. २० एप्रिलपासून याठिकाणी लसीकरण सुरु असून, लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. आरोग्य सेविका विमलबाई वळवी, मुख्याध्यापक कैलास लोहार, दौलत रामोळे, मधुकर कांबळे, राजेंद्र सूर्यवंशी, दिलीप वळवी, संगीताबाई चौधरी, प्रभारी मुख्याध्यापक सुदाम गोसावी परिश्रम घेत आहेत.

कैऱ्यांची तोड सुरु

नंदुरबार : जिल्ह्यात आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या आंब्यांच्या झाडांना कैऱ्या लगडलेल्या दिसून येत आहेत. लोणच्यासाठी सातपुड्यातील गावराणी कैरीला मोठी मागणी असते. यंदा लाॅकडाऊनमुळे या कैरीची बाजारपेठ थंड असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

बिया वेचणे सुरु

नंदुरबार : शहरातील मिरची पथारींवरची मिरची संपून मैदाने रिकामे झाली आहेत. या मैदानांवर सकाळच्या वेळेत महिला व पुरुष मजूर बिया वेचताना दिसून येत आहेत. बिया वेचून त्यांची चांगल्या दराने विक्री होत असल्याने अनेक जण त्या गोळा करतात. सकाळी सहा वाजेपासून मजूर येथे येत आहेत.

सारंगखेडा परिसरात कमी दराने धान्य खरेदी

सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा आणि परिसरात खेडा खरेदीत गहू आणि हरभऱ्याचे किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात खरेदी केली जात असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.सध्या सारंगखेडा आणि परिसरात व्यापाऱ्यांकडून गहू आणि हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर खेडा खरेदी सुरू आहे. गव्हाची शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा कमी दराने ही खरेदी सुरु आहे.

सरपणासाठी धाव

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागातील शेतशिवारात कोरडी झालेली पिके तसेच बांधा लगतची कोरडी झाडे तोडणाऱ्या महिला सातत्याने दिसून येत आहेत. या महिलांकडून हे सरपण गोळा करुन घरी नेले जात आहे. घरी गॅस असला तरीही वाढत्या दरामुळे सरपणाला महत्त्व दिले जात आहे.

जनजागृतीवर भर

खांडबारा : नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात सध्या आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम सुरु आहे. ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे सातत्याने परिसरातील गावांना भेटी देत माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

रनाळे येथील निवारा दुरवस्थेत

नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथील प्रवासी मार्ग निवारा गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त न करण्यात आल्याने निरुपयोगी ठरत आहे. दोंडाईचा ते नंदुरबार मार्गावरचे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव असलेल्या रनाळे येथून नंदुरबार कडे येणाऱ्यांची संख्या मोठी असते. शाळा व महाविद्यालय सुरु असताना याठिकाणी विद्यार्थी व विद्यार्थिनींची गर्दी होते. यातून नवीन निवारा किंवा मिनी बसस्थानक तयार करण्याची मागणी असतानाही आजवर कारवाई झालेली नाही. सद्यस्थितीत निवाऱ्याच्या भिंती पूर्णपणे कोसळून केवळ पत्र्याचे शेड उभे आहे.

वैजाली येथे उपक्रम

शहादा : तालुक्यातील वैजाली येथे कोविड लसीकरण जनजागृती शिबिर घेण्यात आले. येथे एप्रिल महिन्यात ४५ वर्ष वयोगटांतील नागरिकांनी उपस्थित लावत लसीकरण करून घेण्यात आले होते. तूर्तास विविध प्रकारे मार्गदर्शन करुन नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

रिक्त पदे भरावीत

सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा आरोग्य उपकेंद्र संलग्न आहेत. येथे मंजूर केलेल्या ३८ पैकी १५ पदे रिक्त असल्याने अडचणी येत आहेत. केवळ ११ पदेच कार्यरत असतानाही त्यांच्याकडून कामकाज सुरु असल्याची माहिती देण्यात येत आहेत.