शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला लाचखोरीचा व्हायरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 13:04 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे जिल्ह्यातून जेव्हा नंदुरबार जिल्हा स्वतंत्र झाला त्यावेळी जिल्हा निर्मितीच्या हरकतींची ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे जिल्ह्यातून जेव्हा नंदुरबार जिल्हा स्वतंत्र झाला त्यावेळी जिल्हा निर्मितीच्या हरकतींची सुनावणी सुरू असताना एका आदिवासी महिलेने बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावेळी ती म्हणाली होती, ‘आमचा जिल्हा करा पण या नवीन जिल्ह्यात भास्कर वाघला येऊ देऊ नका’ तिची ही प्रतिक्रिया त्यावेळी खूप चर्चेची ठरली होती. पण दुर्दैव नंदुरबार जिल्हा झाल्यानंतर या जिल्हा परिषदेतही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भास्कर वाघचा शिरकाव होत असल्याने तो सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या १५ दिवसात जिल्हा परिषदेतील तीन मोठे अधिकारी लाच घेताना रंगेहात सापडल्याने आता त्याबाबत सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर ही जिल्हा परिषद जलसंधारणाच्या कामातील गैरव्यवहारावरुन गाजली. या गैरव्यवहारासंदर्भात तत्कालिन खासदार माणिकराव गावीत यांनीच तक्रारी केल्या होत्या. तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील यांनीदेखील या तक्रारींचे समर्थन केले होते. ही बाब स्वत: त्यावेळचे महाराष्टÑ राज्य जलसंधारण समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही हा विषय गाजला. त्यावेळी स्व.नाईक यांनी या कामाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमली होती. पण गंमतीची बाब म्हणजे भ्रष्टाचाराची साखळी इतकी खोलवर रुजलेली असते की, संबंधित यंत्रणेने ती समितीच बेकायदेशीर असल्याचे ठरवून बरखास्त करणारे आदेश शासनाकडून आणले. त्यामुळे जलसंधारणातील कथित गैरव्यवहार तेथेच मुरला.पुढे छोट्या-मोठ्या गोष्टी घडतच राहिल्या. गेल्या चार-पाच वर्षापूर्वी जिल्ह्यात विहीर घोटाळ्याचे प्रकरण गाजले. आदिवासी लाभार्थींना विहीर न खोदताच बोगस कागदपत्र तयार करून कोट्यवधींची रक्कम हडप करण्यात आली. हा कारनामा देखील जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्याने केला होता. अर्थात योजना दुसºया विभागाची असताना असे घडले होते.आता गेल्या १५ दिवसात जिल्हा परिषदेतीलच तीन मोठे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. नंदुरबार आणि शहादा पंचायत समितीतील बांधकाम विभागातील अभियंत्यांनी ठेकेदारांना कामाचे बिल मंजूर करताना त्यांच्याकडून टक्केवारीची मागणी केली. त्यात ते अडकले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून मागितलेली रक्कम व तेथील उदाहरणे पाहता जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील बिले मंजूर करताना संबंधित अभियंते अडीच टक्के रक्कम घेत असल्याचे या घटनेतून समोर आले. त्यातील वास्तवता हा तपासानंतर समोर येईलच पण या घटना जिल्हा परिषदेतील व्यवहारावर संशय निर्माण करणाºया निश्चितच ठरल्या. या दोन घटनांची चर्चा संपत नाही तोच गुरुवारी नवापूरला तालुका वैद्यकीय अधिकारीच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. गरोदर मातांची शासकीय योजनेअंतर्गत सोनोग्राफी करणाºया डॉक्टरांकडूनच प्रती पेशंट ठराविक रक्कम मागण्याचा हा प्रकार समोर आला.एकूणच हे प्रकार लक्षात घेता प्रत्येक योजनेचे अनुदान देताना त्यात डल्ला मारणाºयांची कमी नसल्याचे दिसून येते. सध्या कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. तीन महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळात अर्थकारणही ठप्प झाले आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार बोकाळत असल्याचे प्रकरणे समोर आल्याने ती सर्वांसाठीच चिंतेची बाब असून त्याबाबत आता सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.