लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विवाहाचे अमिष दाखवून युवतीचा अत्याचार केल्याप्रकरणी तळोदा येथील एकाविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली़ जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान हा प्रकार घडला़ सागर संजय भांडारकर रा़ तळोदा याने नंदुरबार येथील युवतीसोबत प्रेमसंबध निर्माण करत तिला विवाहाचे अमिष दिले होत़े दरम्यान त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता़ पिडित युवतीने विवाहाची मागणी केल्यानंतर त्याने नकार दिला होता़ याप्रकरणी युवतीने सागर भांडारकर याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संशयित सागर यास पोलीसांनी अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}