शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

Vidhan Sabha 2019 : प्रमुख उमेदवार आपापल्या पक्षात सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:42 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या विधानसभा निवडणुकीतील बहुतेक उमेदवार त्याच पक्षात असून लहान पक्षातील उमेदवारांनी पक्षबदल केले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या विधानसभा निवडणुकीतील बहुतेक उमेदवार त्याच पक्षात असून लहान पक्षातील उमेदवारांनी पक्षबदल केले आहेत. अपक्ष आणि इतर उमेदवार मात्र पाच वर्षात कुठेही चर्चेत दिसून आले नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून कमाल 12 व किमान आठ उमेदवार होते. त्यात नवापूर मतदारसंघात सर्वाधिक 12 उमेदवार, नंदुरबार मतदारसंघात सर्वात कमी अर्थात आठ, अक्कलकुवा मतदारसंघात नऊ तर शहादा मतदारसंघात 11 उमेदवार होते. चारही मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवार दिले होते. काँग्रेस, भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचे उमेदवार पक्षात कायम आहेत. मनसे आणि त्यांचे उमेदवारही पाच वर्षात कधी चर्चेत आले नाहीत. नंदुरबार मतदारसंघात चार प्रमुख पक्षाच्या उमेदवारांमध्ये भाजप, काँग्रेसचे उमेदवार आपापल्या पक्षातत सक्रीय राहिले. शिवसेनेचे विरेंद्र वळवी यांनी शिवसेनेशी दुरावा राखला आहे. क्वचीत प्रसंगी ते सेनेसोबत दिसून आले. मनसेचे गुलाबसिंग वसावे हे दिवंगत झाले. राष्ट्रवादी, बहुजन मुक्ती पार्टी आणि दोन अपक्ष उमेदवार देखील फारसे चर्चेत राहीले नाहीत.शहादा मतदारसंघात 11 उमेदवारांपैकी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे उमेदवार सक्रीय राहिले. परंतु शिसेनेतर्फे निवडणूक लढविणारे सुरेश नाईक नंतर कधीच सेनेच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. तीच स्थिती मनसेच्या किसन पवार यांची. माकचे जयसिंग वळवी पक्षाच्या व्यासपीठावर कायम दिसून आले. तर इतर उमेदवार फारसे चर्चेत दिसून आले नाहीत. नवापूर मतदारसंघात सर्वाधिक 12 उमेदवार होते. पैकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आपापल्या पक्षात सक्रीय होते. भारिपचे अजरूनसिंग वसावेही अधूनमधून काही आंदोलनात दिसून आले. मनसे, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार फारसे चर्चेत किंवा पक्षाच्या व्यासपीठावर दिसून आले नाहीत.अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे उमेदवार आपल्या पक्षात सक्रीय राहिले. तर राष्ट्रवादीचे विजयसिंग पराडके यांनी भाजपची मोट धरली. भाजपमध्ये बंडखोरी करून अपक्ष लढणारे डॉ.नरेंद्र पाडवी हे भाजपच्या व्यासपीठावर सक्रीय राहिले. इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार फारसे दिसून आले नाहीत.