उपाध्यक्ष सभापतींची दालने सुनीसुनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:46+5:302021-03-10T04:31:46+5:30

नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेचे ११ सदस्य अपात्र ठरले आहेत. यात सभापती व उपाध्यक्ष यांचाही ...

Vice President Speakers | उपाध्यक्ष सभापतींची दालने सुनीसुनी

उपाध्यक्ष सभापतींची दालने सुनीसुनी

नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेचे ११ सदस्य अपात्र ठरले आहेत. यात सभापती व उपाध्यक्ष यांचाही समावेश आहे. दरम्यान त्यांची दालनेही बंद असल्याने जिल्हा परिषदेतील वर्दळ थांबल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजीत पाटील तसेच आरोग्य समिती सभापती जयश्री पाटील यांची दालने काही काळांपूर्वी कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी यांच्या वावरामुळे कायम गजबजत होती. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची सभा किंवा विषय समित्यांच्या सभा असोत यावेळी सदस्यांची हक्काची जागा म्हणून ही दालने ओळखली जात होती. पक्षीय राजकारणापेक्षा मैत्रीपूर्ण संबधांमुळे या दालनांमध्ये हास्यविनोद आणि इतर अनेक विषयांवर होणारी चर्चा अधिकारी व कर्मचारीही अनुभवत होते. मंगळवारच्या सभेवेळी तिघांची दालने बंद असल्याने सभेपूर्वी आल्याने बसण्यास जागा मिळाली नसल्याची कैफियत समितीच्या सदस्यांनी मांडली. यामुळे यापुढे सदस्यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष देण्याची मागणी या सभेदरम्यान करण्यात आली होती. ही मागणी जिल्हा परिषद प्रशासनाने मान्य करत तातडीने जागाही उपलब्ध करुन दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तिघेही विद्यमान सभापती अपात्र ठरल्यानंतर त्यांना देण्यात आलेली शासकीय वाहने जिल्हा परिषद आवारात जमा करण्यात आली. थांबवण्यात आली आहेत. तर त्यांच्या दालनांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कुलूप लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली. अपात्रेनंतर शासकीय वाहन व दालन बंद झाले असले तरी दालनाबाहेरील पाट्या मात्र अद्यापही जैसे थेच असल्याचे मात्र यावेळी दिसून आले. पाट्या काढण्याची कारवाई करण्याबाबत आदेश नसल्याने त्या तशाच असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Web Title: Vice President Speakers