शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

व्यासयिकांनी स्वच्छेने काढले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : काही दिवसांपासून शहाद्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम विषयी चर्चा सुरू होती. या अनुषंगाने पालिकेने अतिक्रमणधारकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : काही दिवसांपासून शहाद्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम विषयी चर्चा सुरू होती. या अनुषंगाने पालिकेने अतिक्रमणधारकांना स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अतिक्रमणधारकांनी स्वत:च अतिक्रमण काढत पालिकेला सहकार्य केले. यामुळे पालिकेचा वेळ व आर्थिक खर्च वाचला.शहाद्याच्या प्रमुख रस्ते व अन्य भागात व्यवसायिकांनी आपला व्यवसाय उभारला होता. यामुळे मुख्य रस्त्यांवर रहदारीला अडथळा निर्माण होत होता. त्यात भाजी मार्केट, मेन रोड, चार रस्ता, डोंगरगाव रोड, स्टेट बँक परिसर, खेतिया रोड आदी भागात मोठ्या व्यवसायिकांनी अतिक्रमण केले असून ते कच्चे व पक्के दोन्ही प्रकारचे असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याचे संबाधित व्यापाऱ्यांना पालिकेमार्फत आवाहन करण्यात आले होते. त्याला साद देत अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले. त्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसत आहे.प्रशासनातर्फे शहरात फेरी काढून राहिलेले अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात आले. अतिक्रमण न काढल्यास पालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल व अतिक्रमण धारकांकडूनच खर्च वसूल करण्यात येईल असेही सांगण्यात आले. यावेळी प्रांतधिकारी डॉ. चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन पाटील, माधव गाजरे, मंडळाधिकारी प्रमोद अमृतकर, अभियंता संदीप टेंभेकर, आशिष महाजन, संदीप चौधरी, सचिन महाडिक, राजू चव्हाण व अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी व पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.मागील वर्षी तत्कालीन प्रशासनानेही शहरात वाढलेली अतिक्रमणे काढली होती. मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे अतिक्रमणे पुन्हा वाढले. या वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहाद्याची ओळख बदलू लागली होती. पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी किरकोळ व्यवसायिकांच्या बाबतीत दुजाभाव न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वच अतिक्रमण काढायवे अशी सामान्य जनतेची मागणी आहे. शिवाय पक्के अतिक्रमणही काढून सर्वसामान्यांना पालिका प्रशासनाने न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.शहरात किरकोळ व्यवसायिकांची संख्या अधिक आहेत. त्यात लोटगाडीधारक व टपरीधारकांचा समावेश आहे. हे व्यवसायिक आपला व्यवसाय रस्त्यावर थाटत आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होते आहे. शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. म्हणून या लॉरी धारकांना पालिका प्रशासनाने एखादी जागा उपलब्ध करून दिल्यास वाहतूक मोकळी होईल.काढलेल्या टपºया व लाºया सर्व अतिक्रमण धारकांनी प्रेस मारुती मैदान, स्टेट बँक परिसर, पंचायत समिती कार्यालय व त्या समोरील कृषी विभाग, जलसंधारण व लघुपाटबंधारे कार्यालच्या मोकळ्या जागेत आणून ठेवल्या आहेत. काही दिवसात अतिक्रमण परत पूर्ववत करू आणि या जागेवरून उचलून परत पूर्ववत जागेवर ठेऊ अशा आशेने अतिक्रमण धारकांनी टपºया जवळपासच ठेवल्या आहे.