शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावद पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

निवेदनात म्हटले आहे की, शहादा-धडगाव रस्त्यावर चिखली फाटा चौफुलीवर असलेले पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस, होमगार्ड यांनी दिलेल्या वेळेत ...

निवेदनात म्हटले आहे की, शहादा-धडगाव रस्त्यावर चिखली फाटा चौफुलीवर असलेले पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस, होमगार्ड यांनी दिलेल्या वेळेत सकाळी सात ते ११ वाजेच्या कालावधीत परिसरातील नागरिक, शेतकरी दैनंदिन कामकाज, बँक, पोस्ट ऑफिस, दवाखाना या कामानिमित्त ये-जा करतात. मात्र, पोलीस कर्मचारी फारच त्रास देतात. नागरिक सामाजिक अंतर ठेवून, मास्क लावून वाहन चालवत असले तरी बळजबरीने २०० रुपयांची दंड पावती देत असल्याने जनतेची मने दुखावली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सकाळी सात ते ११ ही वेळ बाजारहाट, दवाखाना, मेडिकल, शेतकरी यांच्यासाठी खुली आहे. मात्र, याच वेळेत पोलीस तपासणी करतात आणि ११ वाजेनंतर मात्र पोलीस नसतात. ११ वाजेनंतर तपासणी करणे गरजेचे असताना खुल्या वेळेतच त्रास दिला जातो. मग नागरिक जातील केव्हा? व परिसरातील गरीब जनतेची लूट थांबवावी, अशी मागणी केली आहे. हा प्रकार थांबावा म्हणून म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर शहादा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, पं. स. सदस्य सत्येन वळवी, डॉ. जाधव ठाकरे, दिलीप पावरा, मडकाणीचे सरपंच प्रल्हाद पवार, राणीपूरचे सरपंच संतोष पावरा, तारसिंग ठाकरे (आमोदा), ओंकार पटले (नवागाव), विनायक पावरा, केशव पावरा (रामपूर), संदीप वळवी, लाला धनगर यांच्या सह्या आहेत.