शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अवैधपणे वृक्ष तोडणाऱ्याचे वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील पालिका हद्दीतील हातोडा रस्त्यावर बेकायदेशीरपणे अवैध वृक्षतोड करणाऱ्या व्यावसायिकांचे वाहन लाकडासह वन विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील पालिका हद्दीतील हातोडा रस्त्यावर बेकायदेशीरपणे अवैध वृक्षतोड करणाऱ्या व्यावसायिकांचे वाहन लाकडासह वन विभागाने  शनिवारी जप्त केले आहे. विशेष म्हणजे पालिकेने या व्यावसायिकास मागीलवर्षी केवळ १९ झाडे तोडण्याची परवानगी दिली होती. त्याची मुदत संपली असताना त्याने त्या परवानाच्या नावावर वृक्षांची कत्तल करणे सुरूच ठेवले होते. वन विभागाचे सबंधित अधिकारी रजेवर असल्याने पुढील चौकशी थांबली आहे. तथापि, यंत्रणेने त्याकडे आतापर्यंत साफ दुर्लक्ष केल्याने वृक्षप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बेकायदेशीरपणे वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.                                   तळोदा पालिका हद्दीतील पालिकेने शहरातील हातोडा रोड व चिनोदा रस्त्याचे रुंदीकरण, रस्ता दुभाजकाचे काम हाती घेतले आहे. साहजिकच या रस्त्याच्या कामासाठी अडथळा ठरणारे वृक्ष काढण्याची परवानगी संबंधित व्यापाऱ्यास देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने चिनोदा रस्त्यावरील १८ झाडे व हातोडा रस्त्यावरील एक झाड असे एकूण १९ झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली होती. ही परवानगी गेल्यावर्षी ६ ऑगस्ट २०२० रोजी देण्यात आली होती. असे असताना त्या परवानगीच्या नावावर हातोडा रस्त्यावरील इतर वृक्षांची तोड त्याने सुरूच ठेवली होती. याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र दुबे यांनी त्यास विचारणा केली होती. त्यावेळी त्याने उडवाउडवीचे उतरे दिली.                       दुबे यांनी त्याच्याकडे सबंधित वन विभाग अथवा पालिकेचा परवानादेखील मागितला. परंतु वन विभागाचा  परवाना नव्हता शिवाय पालिकेने जो परवाना दिला होता. तो एकच झाडाचा होता. ते म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाजवळचे होते. तेही त्याने आधीच तोडले होते. वन विभागाचे कर्मचाऱ्यांना हा प्रकार कळविल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशी केल्यानंतर वाहन लाकडासह जप्त केले आहे. विशेष म्हणजे या व्यापाऱ्याने आपल्या वाहनात कत्तल केलेल्या वृक्षांच्या लाकडांवर बाभळीची झुडपे तोडून ठेवली होती. याप्रकरणी तळोदा वन विभागाचे वनक्षेत्रपाल नीलेश रोहडे यांना मोबाईलवरून संपर्क केला असता त्यांनी उचलला नाही. परंतु ते रजेवर आहेत. सोमवारी आल्यानंतर चौकशी करणार आहेत. मात्र आजतागायत बेकायदेशीरपणे बिनभोबाट डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात असल्याने संबंधित यंत्रणांच्या भूमिकेबाबत वृक्षप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता या व्यापाऱ्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले  आहे.

हातोडा रस्त्यावर पालिकेने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे तेथे  अडथळा ठरणारे उपजिल्हा रुग्णालयाजवळील एकच झाड व चिनोदा रस्त्यावरील १८ झाडे अशी १९ झाडे उतरविण्याची परवानगी सबंधित व्यापाऱ्यास देण्यात आली होती. याउपरात इतर झाडे तोडून उतरविले असेल तर पालिका अभियंता सोमवारी प्रत्यक्ष पंचनामा करण्यास पाठवून कारवाई करण्यात येईल.-सपना वसावा, मुख्याधिकारी, नगर पालिका, तळोदा.