शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिनानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आई, वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेच्यावतीने १५ जून ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिनानिमीत्त ...

येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आई, वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेच्यावतीने १५ जून ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिनानिमीत्त ज्येष्ठ नागरिक कायदा साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दिवाणी न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश मलिये यांनी ज्येष्ठ नागरिकांना न्यायालयाकडून दिल्या जाणाऱ्या योजना सवलतीविषयी माहिती दिली.

यशवंत स्वर्गे यांनी तरुण पिढीला संस्काराची गरज असल्याचे सांगत, पीडित ज्येष्ठ नागरिक आणि शासनाचे आधिकारी यांच्यात समन्वय साधण्याचे संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

नामदेव शिंदे, आत्माराम चौत्राम इंदवे यांनी मनोगत व्यक्त केले. आपबिती या सदराखाली सुदाम दळवी, प्रमिला नाना पवार, सनतकुमार अनिरुद्ध त्रिवेदी, पद्माकोर राजपूत यांनी आपल्या व्यथा मांडल्या. जिल्हा पेन्शनर संघाचे अध्यक्ष मधुकर रामजी साबळे यांनी एकूण ७ ठराव मांडले. पोलीस निरीक्षक महेश माळी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. नीलम रवींद्र पाटील हिने कविता सादर केली. ॲड. गोविंदभाई पाटील, हैदरअली नुरानी, वसंत चौधरी, डॅा. पीतांबर सरोदे, सैयद इ.डी. लियाकतअली, मगनभाई पाटील, तिरथदास धनवाली, नगिनदास अग्रवाल, जावेद गमीर धोबी, श्रीकांत पाठक,अशोक टेंभेकर आदी उपस्थित होते.

आनंदा बारका पाटील आणि आत्माराम चौत्राम इंदवे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी लागणारा खर्च आणि परिश्रम घेतले. प्रास्ताविक बारकू नवल पाटील यांनी केले.

सूत्रसंचालन गणपत पाटील यांनी केले.

यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षणाबाबतच्या कायदेशीर तरतुदींची अंमलबजावणी करावी. आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुला-मुलांची यादी जाहीर करावी. ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करावी. ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कामकाज प्रभावीपणे राबविण्यात यावे. पोलीस अधिकारी /कर्मचारी यांना ज्येष्ठ नागरिक कायद्याचे प्रशिक्षण द्यावे. जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष पोलीस युनिट तयार करण्यात यावे. पोलीस प्रशासनाने १५ जून ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस पाळावा.