शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

वैजाली-करणखेडा रस्त्याची लागली ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : खरवड ते वैजाली रस्ता काही ठिकाणी वाहून गेला आहे तर काही ठिकाणी रस्त्यावरच चक्क ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : खरवड ते वैजाली रस्ता काही ठिकाणी वाहून गेला आहे तर काही ठिकाणी रस्त्यावरच चक्क काटेरी झुडपे उगवले आहेत. रस्त्यादरम्यान असलेले फरशी पूलही तुटले आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणे म्हणजे जिकीरीचे झाले असून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी खरवड, वैजाली, करणखेडा येथील ग्रामस्थांकडून होत आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २००९-१० मध्ये या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम झाले होते. या रस्त्यामुळे परिसरातील गावांमधील नागरिकांची सोय झाली होती. मात्र सद्यस्थितीत रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी तर रस्त्याचे अस्तित्वच दिसत नाही. खरवड, वैजाली, करणखेडा आदी गावांमधील शेतकऱ्यांसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. मात्र शेतात शेती औजारे, खते नेण्यासाठी व शेतातून शेतमाल वाहतुकीसाठी हा रस्ता अयोग्य झाला आहे. शेतकऱ्यांना कसरत करीत आपली वाहने चालवावी लागतात.करणखेडा -वैजाली रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. या रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या पूलापासून मार्ग नसल्याने नदीतून उतरुन जावे लागते. काही वाहनधारक हा रस्ता शॉर्टकट असल्याने येथून ये-जा करतात. पुढे गेल्यावर वैजालीनजीक एका नदीवर पुलाचे बांधकामही झाले आहे. वैजालीला पोहोचण्यासाठी या रस्त्याने दीड किलोमीटर अंतर आहे. मात्र रस्त्याच्या दुर्दशमुळे नांदर्डेमार्गे पाच किलोमीटरचा फेरा मारुन वाहनधारकांना जावे लागते. वैजाली गावाजवळील पूल संपल्यानंतर रस्ता नसल्याने याठिकाणी रस्ता तयार करण्याची गरज आहे. कलमाडी रस्त्याला हा रस्ता जोडल्यास ग्रामस्थांना सोयीचे होणार आहे.रस्ता नसताना फरशीची दुरुस्ती का?करणखेडा ते वैजाली मार्गावर खड्डे, काटेरी झुडपे तर काही ठिकाणी रस्त्याच वाहून गेला आहे. ही कामे महत्त्वाची असताना लाखो रुपये खर्च करून येथे फरशीचे बांधकाम का झाले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यात नाल्याला आलेल्या पुरामुळे फरशी पुलाचा भरावही वाहून गेला आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.