भोरटेक व कोचरा येथे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST2021-05-25T04:34:31+5:302021-05-25T04:34:31+5:30

ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी विशेष उपक्रम राबविला असून लसीकरण करून घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दोन किलो ...

Vaccination at Bhortek and Kochra | भोरटेक व कोचरा येथे लसीकरण

भोरटेक व कोचरा येथे लसीकरण

ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी विशेष उपक्रम राबविला असून लसीकरण करून घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दोन किलो तांदूळ व दोन किलो साखर स्वखर्चातून वाटप करण्यात येते. भोरटेक व कोचरा येथे आयोजिलेल्या लसीकरण शिबिरात लसीकरण केलेल्या ग्रामस्थांना तांदूळ व साखरेचे वाटप करण्यात आले. या वेळी खेडदिगरच्या सरपंच मंजुळाबाई मुसळदे, जि.प.चे माजी सदस्य सुनील चव्हाण, मुबारकपूरचे सरपंच नीलेश अहिरे, जामचे सरपंच सुभाष वाघ, गोपाळ पवार, महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा पवार, कोचरा येथील सरपंच सुनीताबाई ठाकरे, ग्रामसेविका रूपाली सिसोदिया, ग्रामसेविका प्रतिभा पवार, विक्की ठाकरे, गोपाळ गांगुर्डे, स्वीय सहायक हेमराज पवार, सचिन पाटील, सुनील पवार, जयसिंग पवार, राजू सोनवणे, संपत ठाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.वंदना पवार, डॉ.बी.डी. निकुम, डॉ. हेमंत बच्छाव, करणसिंग ठाकरे, एस.एम. ठाकरे, पाठक, सूर्यवंशी, शिक्षक-शिक्षिका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Vaccination at Bhortek and Kochra