रामचंद्रफळी येथे १८४ जणांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST2021-05-24T04:28:51+5:302021-05-24T04:28:51+5:30

शिबिराचे उद्घाटन रामचंद्रफळीचे केंद्रप्रमुख सुरेश भदाणे यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्याध्यापक छोटीराम अहिरे, सुदाम पाटील, शिवाजी पवार, ए.बी. ...

Vaccination of 184 persons at Ramchandraphali | रामचंद्रफळी येथे १८४ जणांना लसीकरण

रामचंद्रफळी येथे १८४ जणांना लसीकरण

शिबिराचे उद्घाटन रामचंद्रफळीचे केंद्रप्रमुख सुरेश भदाणे यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्याध्यापक छोटीराम अहिरे, सुदाम पाटील, शिवाजी पवार, ए.बी. सूर्यवंशी, ग्रामसेवक ठेलारी, शिक्षक सुनील गांगुर्डे, कृष्णा रायते, विनेश वळवी, गोकुळदास बेडसे, कैलास ढोले, अलिशा गावीत, मनीषा पाडवी यांनी उपस्थित राहून लसीकरणाबाबत प्रबोधन व जनजागृती केली. सरपंच विनायक गावीत, सदस्य सुकदेव कोकणी यांनी सदर शिबिरासाठी ग्रामपंचायततर्फे शिबिर घेण्यासाठी मदत केली. गटविकास अधिकारी सी.के. माळी, तलाठी किशोर गांगुर्डे, शालेय शिक्षण समितीचे चुनिलाल कोकणी, त्र्यंबक कोकणी, रमेश कोकणी, पत्रकार राजेंद्र पवार यांनी भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र पळशीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.एकता नाईक, डॉ.अस्मिता पाडवी, डॉ.हनीफ अन्सारी, पर्यवेक्षक व्ही.एस.पाडवी, आशा कार्यकर्ती लता गावीत, गुळवे, आरोग्य सहायक प्रमिला गावीत, संदीपा वसावे, सुमित्रा कोकणी, सुगी गावीत, नीता गावीत, सुशीला कोकणी यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Vaccination of 184 persons at Ramchandraphali