शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या कार्यालयांना निकड इलेक्ट्रिकल ऑडिटची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

शाॅर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रकार राज्यातील विविध भागांत घडत आहेत. यात सर्वांना वीजपुरवठा देत उजेड देणा-या वीज वितरण कंपनीच्या ...

शाॅर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रकार राज्यातील विविध भागांत घडत आहेत. यात सर्वांना वीजपुरवठा देत उजेड देणा-या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्येच सुरक्षेबाबत अंधार असल्याचे चित्र दिसून आले आहे. शहरातील गिरीविहार, नेहरूनगर, बाजार समिती परिसरात या कार्यालयांमध्ये भेटी दिल्या असता, येथील दिवे, स्वीच हे गेल्या अनेक काळात बदलण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी वायरिंगही खराब झाल्याचे दिसून आले आहे. गिरीविहार येथील इंदिरासंकुलातील कार्यालय एका छोट्याशा जागेत सुरू आहे. यातून वीजकंपनीकडूनच कर्मचारी सुरक्षेबाबत उदासीन भूमिका असल्याचे दिसून आले. नंदुरबार जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे दोन विभाग आहेत. यात शहादा आणि नंदुरबार या दोन विभागांत स्वतंत्र कार्यालये आहेत. नंदुरबार शहरात बसस्थानक परिसरात वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. अत्यंत मोकळी अशी इमारत असतानाही अडगळीचे स्वरूप या जागेला प्राप्त झाले आहे. जागोजागी जुनाट वीजसाहित्य टाकले आहे.

इंदिरासंकुल

शहरातील इंदिरासंकुलात शहराच्या दुस-या बाजूचा कारभार सांभाळणारे वीज कंपनीचे कार्यालय आहे. अत्यंत अडगळीच्या या जागेत अधिका-यांना कधी-कधी बसण्यासही जागा नसल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने या कार्यालयात एकच लाइट लावून रात्रीच्या वेळी कामकाज केले जाऊ शकते.

बसस्थानक परिसर

नंदुरबार बसस्थानकासमोर वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय आहे. याठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांची दालने आहेत. ही इमारतही कंपनीने भाडेकरार पद्धतीने घेतली आहे. या इमारतीच्या जीर्ण भिंती आणि उखडलेली इलेक्ट्रिक फिटिंग कंपनीच्या बेफिकीर कामकाजाची साक्ष देते. याठिकाणी अग्निरोधक यंत्रेही दिसून आलेली नाहीत.

बाजार समिती

अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय बाजार समिती परिसरात रस्त्याला लागून आहे. ही इमारतही जुनीच आहे. या इमारतीचेच ऑडिट होण्याची आवश्यकता आहे. आतील भागात काही चांगल्या सोयी असल्या, तरीही इलेक्ट्रिक ऑडिटबाबत मात्र उदासीनता असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी विजेचे दिवे आणि इमारतीच्या भिंतीवरील वायरी बाहेर आल्याचे दिसून आले.