भवरे येथे अज्ञात महिलेचा गळा चिरून खून

By Admin | Updated: April 15, 2017 12:42 IST2017-04-15T12:42:14+5:302017-04-15T12:42:14+5:30

नवापूर तालुक्यातील भवरे येथे 30 वर्षीय महिलेचा धारदार चाकूने गळा कापून व पोटात चाकू मारून खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी मिळून आला.

An unknown woman cut her throated blood in Bhavare | भवरे येथे अज्ञात महिलेचा गळा चिरून खून

भवरे येथे अज्ञात महिलेचा गळा चिरून खून

 नवापूर,दि.15- तालुक्यातील भवरे येथे 30 वर्षीय महिलेचा धारदार चाकूने गळा कापून व पोटात चाकू मारून खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी मिळून आला.

 शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेपूर्वी भवरे येथील लक्ष्मण गोपू कोकणी यांच्या शेतात 25 ते 30 वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह मिळून आला. नवापूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामदास पाटील व सहका:यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मयत महिलेचा चेहरा गोल असून मोरपंखी रंगाचे ब्लाऊज व पिवळ्या, लाला, गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. गळ्यात काळ्या मणींची पोत व पायात पांढ:या रंगाच्या धातूचे पैंजण मिळून आले. अज्ञात आरोपीने महिलेचा धारदार चाकूने गळा कापून व पोटात चाकू मारून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: An unknown woman cut her throated blood in Bhavare