काकर्दे येथे मातीचे घर पडल्याने दोन महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:41 IST2020-06-18T12:41:18+5:302020-06-18T12:41:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील काकर्दे येथे खंडोबा मंदीर परिसरातील मातीचे घर कोसळून त्याखाली दाबले जाऊन दोघी महिला ...

Two women were injured when a mud house collapsed at Kakarde | काकर्दे येथे मातीचे घर पडल्याने दोन महिला जखमी

काकर्दे येथे मातीचे घर पडल्याने दोन महिला जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील काकर्दे येथे खंडोबा मंदीर परिसरातील मातीचे घर कोसळून त्याखाली दाबले जाऊन दोघी महिला जखमी झाल्या़ बुधवारी सकाळी ही घटना घडली़
कमलबाई हिरामण मराठे (६०) व भटाबाई बुधा मराठे (५२) अशी जखमी महिलांची नावे आहेत़ बुधवारी सकाळी सहा वाजता अचानक त्यांचे मातीचे घर कोसळले़ यावेळी दोघी महिला घरात होत्या़ ही घटना दिसून आल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत ढिगाऱ्यात दाबल्या गेलेल्या दोघी महिलांना बाहेर काढले़ गावातील सुभाष जटारे, हिरालाल माळी, सुकदेव जटारे, जगदीश माळी, संतोष महाजन, राहुल माळी यांनी मदत कार्य करत दोघींना बाहेर काढले़ दोघा जखमी महिलांना नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले होते़ दरम्यान दोघींची प्रकृती स्थिर आहे़ ग्रामस्थांनी तातडीने महसूल विभागाला याबाबत माहिती दिली आहे़ तलाठींकडून गुरुवारी पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ घर कोसळले त्यावेळी लहान मुले घराबाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला़

Web Title: Two women were injured when a mud house collapsed at Kakarde