प्रकाशा येथे डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:26+5:302021-03-10T04:31:26+5:30

पोलीस सूत्रानुसार, चंद्रकांत सुदाम समुद्रे (२८, रा. व्यावल, ता. निझर) हा युवक सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रकाशा गावातून मेनरोडवर ...

Two-wheeler hit by dumper at Prakasha | प्रकाशा येथे डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

प्रकाशा येथे डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

पोलीस सूत्रानुसार, चंद्रकांत सुदाम समुद्रे (२८, रा. व्यावल, ता. निझर) हा युवक सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रकाशा गावातून मेनरोडवर आला. त्यादरम्यान शहादाकडून येणारा डंपर (क्रमांक एम.एच.३९- ए.डी. ०६६०) चालकानेपुढे चालणाऱ्या दुचाकीस्वारास ठोस दिली. त्यात दुचाकीस्वार चंद्रकांत सामुद्रे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना नातेवाईक व इतर लोकांनी प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. अपघात झाला त्यावेळी बसथांब्यावर गर्दी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. सुदाम सामुद्रे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, तपास उपनिरीक्षक माया राजपूत ह्या करीत आहेत.

चंद्रकांत सामुद्रे हे पुष्पदंतेश्वर साखर कारखान्यात नोकरीला होते. कुटुंबातील कर्ता व एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Two-wheeler hit by dumper at Prakasha