नंदुरबारात आज दोन हजार विद्यार्थी देणार एमपीएससीची पूर्व परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST2021-03-21T04:28:46+5:302021-03-21T04:28:46+5:30

शहरात एच. जी. श्रॉफ हायस्कूल, जी. टी. पाटील महाविद्यालय भाग एक आणि दोन, दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल, कमला नेहरु कन्या ...

Two thousand students will give pre-examination of MPSC in Nandurbar today | नंदुरबारात आज दोन हजार विद्यार्थी देणार एमपीएससीची पूर्व परीक्षा

नंदुरबारात आज दोन हजार विद्यार्थी देणार एमपीएससीची पूर्व परीक्षा

शहरात एच. जी. श्रॉफ हायस्कूल, जी. टी. पाटील महाविद्यालय भाग एक आणि दोन, दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल, कमला नेहरु कन्या विद्यालय, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल अशा सहा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी २ हजार २३२ परीक्षार्थींची नोंदणी झाली आहे.

या पार्श्वभूमीवर २१ मार्च रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात यादरम्यान परीक्षा केंद्राच्या २०० मीटर आवारात कोणीही प्रवेश करु नये तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या २०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एस. टी. डी, आय. एस. डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. हे आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांच्यासाठी लागू राहणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान परीक्षेसाठी सर्व सहा तालुक्यातून परीक्षार्थी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून कोविड उपाययोजनांसह परीक्षा घेण्यावर भर देण्यात येणार आहे. यात मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग बंधनकारक करण्यात आली आहे.

Web Title: Two thousand students will give pre-examination of MPSC in Nandurbar today