शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

वळण रस्त्यावर चार वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दोनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वळण रस्त्यावरील नवापूर चौफुली ते कोकणीहिलर्पयतचा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र झाला आहे. दोन दिवसात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वळण रस्त्यावरील नवापूर चौफुली ते कोकणीहिलर्पयतचा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र झाला आहे. दोन दिवसात दोन अपघात होऊन चारजण जखमी झाले आहेत. दरम्यान, शनिवारी एकाचवेळी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. वळण रस्त्यावर वाहने भरधाव जात असतात. चार महिन्यांपूर्वी कल्याणेश्वर गणपती मंदीराजवळ अपघात होऊन युवतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले. आता कोकणीहिल ते नवापूर चौफुली हा रस्ता अपघाती म्हणून ओळखला जात आहे. शनिवारी सायंकाळी या ठिकाणी विचित्र अपघात झाला. एक कार, एक पीकअप वाहन आणि दोन दुचाकींमध्ये हा अपघात झाला. सोनगीरपाडा आरोग्य उपकेंद्रातील डॉ.सचिन चैत्राम नेरकर हे आपल्या दुचाकीने वाघेश्वरी चौफुलीकडे जात असतांना पी.के.अण्णा पाटील विद्यालयासमोरील रस्त्यावर अचानक त्यांच्या दुचाकीपुढे कुत्रा आल्याने त्यांनी अचानक ब्रेक दाबला. त्यांच्या मागे येणा:या कारने त्यांना वाचविण्याचा प्रय}ात दुचाकीला धडक दिली. त्यांच्या मागे असलेल्या पीकअप वाहनाने कारला धडक दिली. त्याचवेळी समोरून येणा:या आणखी एका दुचाकीला पीकअपची धडक बसली. या विचित्र अपघातात दोनजण जखमी झाले. त्यातील महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे   समजते. याबाबत सचिन नेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पीकअप वाहनचालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहे. दोन दिवसांपूर्वीच नवापूर चौफुलीजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोनजण जखमी झाले होते. कुंदन भरत भिल व सचिन दिपक भिल, रा. लहान माळीवाडा, नंदुरबार असे जखमींची नावे आहेत. भरधाव येणा:या कारने (क्रमांक एमएच 39-एन 3381) दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोन्ही युवक जखमी झाले. अपघातानंतर कार न थांबता तेथून पसार झाली. याबाबत कुंदन भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहे. 

अपघात झालेल्या ठिकाणी शाळा आहे. थोडय़ाच अंतरावर दंडपाणेश्वर मंदीर आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. पी.के.अण्णा पाटील शाळेने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र देवून या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. परंतु दोन्ही विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दोन्ही विभाग आणखी किती अपघातांची वाट पहाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.