शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखाचे सागवान व फर्निचर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : वनविभागाच्या नवापूर येथील पथकाने शहराजवळ विजापूर शिवारात छापा टाकुन सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : वनविभागाच्या नवापूर येथील पथकाने शहराजवळ विजापूर शिवारात छापा टाकुन सुमारे दोन लाख रुपये किमतीचा सागवानी प्लायवूड व तयार फर्निचर जप्त करुन एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.नवापुर तालुक्यातील विजापूर येथे अवैध लाकूड आणि फर्निचर असल्याची माहिती मंगळवारी वनविभागाला मिळाली होती़ त्यानुसार सहायक वनसंरक्षण जी़आऱ रणदिवे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हाडपे, वनपाल प्रकाश मावची, डी.के. जाधव, वनरक्षक सतीश पदमर, प्रशांत सोनवणे, कल्पेश अहिरे, भगवान साळवे, माजी सैनिक रवींद्र कासे यांच्या पथकाने विजापूर पाहणी केली होती़ दरम्यान गावातील विनायक गावीत यांच्या घराची झडती घेतली असता, त्यात घरात मोठ्या प्रमाणात अवैध साग चौपाट व रंधायंत्र, डिझाईन यंत्र, सुतार कामाचे साहित्य व तयार सोफासेट, बॉक्स पलंग आढळून आले. एकूण १२२ साग साईज नग २.३१६ घनमीटर लाकूड असा माल आढळून आला. हे लाकूड जप्त करून नवापुर येथील वनविभागाच्या शासकीय काष्ठ आगारात जमा करण्यात आले़ गुन्ह्याकामी वनक्षेत्रपाल यांनी प्रथम अहवाल जारी करुन एका संशयिताविरूध्द गुन्हा नोंद केला. जप्त मालाची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे.ही कारवाई नंदुरबार येथील शहादा उपवनसंरक्षक एस़बीक़ेवटे, सहायक वनसंरक्षक जी़आऱ रणदिवे दक्षता विभागाचे विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़ या गुन्ह्याचा तपास वडकळंबीचे वनपाल दिपक जाधव करत आहेत़