शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक शेतीतून हळद उत्पादन

By admin | Updated: May 11, 2017 16:17 IST

नंदुरबार जिल्ह्यातील पहिला प्रयोग ठरला यशस्वी

कलसाडी, ता.शहादा येथील शेतकरी राजेंद्र रमण चौधरी, पुंजालाल गिरधर चौधरी, जयेश रवींद्र चौधरी, जयकृष्ण बुला चौधरी, भरत हरी पाटील, हेमंत नरोत्तम चौधरी, वसंत फकिरा पाटील, अनिल छोटुलाल चौधरी, प्रकाश भाईदास चौधरी, कैलास भाईदास चौधरी, उमाकांत तुकाराम चौधरी, प्रकाश माणिक चौधरी, अरविंद राजाराम चौधरी, दगडू नरसई चौधरी आदी शेतक:यांनी गट तयार केला.
नवीन पीक घेऊन नवीन काही करून दाखविण्याचा संकल्प या शेतक:यांनी केला. त्यानुसार हळदीचे पीक घेण्याचे नियोजन केले. त्यासाठी फैजपूर (सावदा) येथे हळदीची शेती कशी केली जाते, याची माहिती घेण्यासाठी हे शेतकरी  त्या भागात गेले. तेथून माहिती घेऊन त्यांनी कलसाडी परिसरात तसा प्रयोग करण्याचे ठरविले.
 
या शेतक:यांनी सावदा येथूनच पाच क्विंटल सेलम नावाच्या हळदीचे खोडं आणून लावली.  सुरुवातीला शेतकरी ओली हळद 500 ते 600 रुपये क्विंटलप्रमाणे विक्री करीत होते. यावर काही शेतक:यांनी शक्कल लढवून उत्पादित केलेल्या हळदीवर प्रक्रिया करून बाजारात विक्री केली तर नफा अधिक मिळेल, याचा अभ्यास केला. 
 
त्यानुसार 10 ते 15 शेतक:यांनी मिळून बॉईलर मशीन आणले. या बॉईलरजवळ पॉलिश मशीन सुद्धा असते. यात दोन क्विंटल ओली हळद टाकून तिला 20 ते 40 मिनिटांर्पयत शिजवून बाहेर काढून तिला 15 दिवसांसाठी पातळ कापडावर वाळविण्यासाठी टाकतात.
गेल्या वर्षी सात ते आठ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळाला होता. यावर्षी मात्र पाच ते सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. 
हळद वाळविण्यासाठी दिवस-रात्र मजूर लागतात. त्यानंतर पुन्हा हळद पॉलिश मशीनमध्ये टाकून पॉलिश करून सातारा, सांगली येथील बाजारात विक्रीसाठी नेली जाते.