शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात डिव्हायडरवर ट्रक आदळून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाइटचा प्रकाश डोळ्यावर आल्याने चालकास समोरचे न दिसल्याने कांद्याने भरलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाइटचा प्रकाश डोळ्यावर आल्याने चालकास समोरचे न दिसल्याने कांद्याने भरलेला ट्रक दुभाजकावर आदळल्याची घटना घडली. शहराबाहेरील प्रकाशा रस्त्यावर वीज केंद्राजवळ रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दुभाजकावर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे महिनाभरात हा सहावा अपघात झाला.कोळदा ते खेतिया रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. हा मार्ग  शहादा शहरातून जात असल्याने वाहनांची वर्दळ असते. रविवारी पहाटे महुआ येथून कांद्याने  भरलेला ट्रक (क्र. जीजे ७ टीटी  ८९५७) चंद्रपूरकडे जात असताना शहरानजीक १३२ केव्ही वीज उपकेंद्राजवळ समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाइटमुळे चालकाच्या नजरेस दुभाजक दिसले नाही. त्यामुळे कांद्यांनी भरलेला ट्रक त्यावर धडकून उलटला. सुदैवाने चालक व सहचालकास दुखापत झाली नाही. मात्र ट्रकचे व कांद्याचे मोठे नुकसान झाले.दरम्यान, शहराच्या हद्दीत असलेल्या दुभाजकावर रेडियम लावणे गरजेचे आहे. या रस्त्याचे काही ठिकाणी काम पूर्णत्वास आले  तर काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने छोटे-मोठे अपघात नेहमी होत आहेत. शिवाय रस्त्यावर  मोठ्या प्रमाणावर धूळ उडत  असल्याने त्याचा त्रास सहन करावा लागतो. धुळीच्या त्रासाबरोबर रात्रीच्यावेळी डिव्हायडर दिसावेत यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. या रस्त्यावर महिनाभरात सहाव्यांदा अपघात झाला आहे. संभाव्य मोठा अपघात टाळण्यासाठी या दुभाजकांवर रेडियम लावून अपघात होणार नाही यासाठी संबंधित ठेकेदाराने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.