आदिवासी सांस्कृतिक सन्मान महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:11 PM2019-09-10T12:11:15+5:302019-09-10T12:11:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : आदिवासी मौखिक साहित्य परिषद व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसावद येथे ...

Tribal Cultural Honor Festival | आदिवासी सांस्कृतिक सन्मान महोत्सव

आदिवासी सांस्कृतिक सन्मान महोत्सव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : आदिवासी मौखिक साहित्य परिषद व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसावद येथे आदिवासी सांस्कृतिक सन्मान महोत्सव घेण्यात आला. या सोहळ्यात आदिवासी संस्कृती, साहित्य व चालीरितींचे जतन करणा:यांना गौरविण्यात आले.
महोत्सवात आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, सेवानिवृत्त वनअधिकारी नामदेव पटले, आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे संयोजक भिमसिंग वळवी, वासुदेव गांगुर्डे, दामू ठाकरे, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी देविदास बोरसे, पं.स. सभापती वांगीबाई पावरा, पं.स.चे माजी सभापती दरबारसिंग पावरा, सुरेश नाईक, वनिताबाई पटले, चिमण ठाकरे, हरी खराडे, राजू जाधव, प्रदीप गावीत, दारासिंग ठाकरे, रतिलाल पवार, काशीराम ठाकरे, कुवरसिंग पाडवी, सत्तरसिंग ठाकरे, सहदेव वाघ, गणेश ठाकरे, वसंत भंडारी, खेत्या वळवी, भूरसिंग पवार, आपसिंग निकुंभ, अशोक शेमले,  देवीसिंग पावरा, दिगंबर पावरा, काशीराम पावरा आदी उपस्थित   होते. 
वाहरू सोनवणे म्हणाले की, आदिवासी हा उत्सवप्रिय समाज असल्याने प्रत्येक आदिवासीने जोरदार उत्सव साजरे केले पाहिजे. परंतु विविध आमिषे प्रलोभने देत नाचायला लावतील, त्यांच्यापासून जरा सावधच राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आदिवासी लग्नातील गीते व ढोलसह अन्य पारंपरिक वाद्यांचा आवाज, ताल-सूर यांचा निसर्गाशी कसा संबंध येतो हे त्यांनी विविध गाणी व आवाजातून पटवून दिले. आदिवासी संस्कृती, गीते व अन्य सर्वच माध्यमातून फसवणूक होत आहे यापासून सावध राहण्याचे आवाहन करीत आपली संस्कृती, गीते, चालीरीती दूषित झाल्या आहे, हे केवळ भोगवादी विचारांचा शिरकाव झाल्यामुळे झाल्याचे सिद्ध केले. आज शासनामार्फत भजनी साहित्य दिले जात आहे. ते घ्या परंतु आदिवासी जीवनाचे प्रतिबिंब दर्शविणारी भजने म्हटली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही सोनवणे यांनी व्यक्त केली. राजेंद्रकुमार गावीत म्हणाले की, आदिवासी संस्कृती व चालीरीती अप्रतिम असल्यामुळे यावर संशोधने होत आहे. त्यामुळे ही संस्कृती, चालीरीती टिकल्या पाहिजे. परंतु त्यासाठी अत्यल्प प्रय} होत आहे. ही संस्कृती जतन करीत संवर्धनासाठी जे प्रय} करीत आहे ते त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठीच अधिक योगदान देत आहेत. प्रत्येक आदिवासीने आपले हक्क व स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. साहित्यिक विश्राम वळवी यांनी आकाश-पाताळ व प्रकृतीशी आदिवासींच्या नाळ जुळल्या हे स्पष्ट करताना आकाशवाणीचे पहिले संगीत आदिवासींच्या गीतांमधून घेतल्याचे सांगितले. किसन महाराज यांनी आदिवासींचा भूतकाळ, वर्तमान व भवितव्य यावर प्रकाश टाकला. वनिताबाई पटले यांनी आदिवासींचे शिक्षण, मौखिक व लिखित साहित्यावर मार्गदर्शन केले. नरेंद्र पाडवी यांनी आदिवासी संस्कृतीचे प्रतीक ढोल या वाद्याचे, घडण, शास्त्रीय व सांस्कृतिक महत्त्व पटवून दिले.

Web Title: Tribal Cultural Honor Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.